शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील फरार गुन्हेगाराला १५ वर्षानंतर अटक; मुंबई गुन्हे शाखेने पुण्यात केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 21:10 IST

विक्रम पटेल उर्फ विकी या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष 8 च्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तो तब्बल 15 वर्षांपासून फरार होता. 

ठळक मुद्दे विक्रम पटेल उर्फ विकी हत्येच्या दिवसापासून फरार होता. या हत्याकांडात एक़ आरोपीला फाशी आणि इतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवकर यांचे पथक 26 जानेवारी रोजी विकीला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ओळख लपवून वावरत असलेल्या विक्रांत उर्फ विकीला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली

मुंबई - गुजरातमधील सुरत शहरात 2004 मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील विक्रम पटेल उर्फ विकी या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष 8 च्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तो तब्बल 15 वर्षांपासून फरार होता. गुजरातमधील सुरत शहरात एका गुन्हेगारी टोळीने 2004 मध्ये दहशत पसरवली होती. या टोळीने गॅस कंपनीकडून आल्याचे सांगत एका व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकला होता. त्यांनी चाकूच्या धाकावर घरातील सदस्यांना डांबून घर लुटले होते. या टोळीने गुंजन शोभना या व्यावसायिकाची हत्या केली होती. या प्रकरणात उमरा पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. मात्र, विक्रम पटेल उर्फ विकी हत्येच्या दिवसापासून फरार होता. या हत्याकांडात एक़ आरोपीला फाशी आणि इतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील विकी हा हत्येच्या दिवसापासून फरार होता. या प्रकरणी महेश भोसले या आरोपीसा पॅरोलवर सोडण्यात आल्यानंतर तो दहा वर्षापासून फरार होता. पोलीस महेशच्या मागावर असताना पुण्याच्या चिंतामणी परिसरात या हत्याकांडातील फरार आरोपी विक्रम उर्फ विकी हा लपला असल्याची माहिती गुन्हे शाखा 8 च्या पोलिसांना मिळाली. विकीला गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ने या पूर्वी एका गुन्ह्यात अटक केली होती. मात्र, त्यावेळी तो हत्येतील फरार आरोपी असल्याची माहिती पोलिसांना नव्हती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो पुण्यात स्थायिक झाला. पुण्यात विकी हा मोबाइल कंपनीची गॅलरी चालवत होता. त्याची पहिली पत्नी ही मुंबईची राहणारी असून तो दुसरे लग्न करून पुण्यात वास्तव्यास होता. विकीवर 3 सराईत गुन्ह्यांची नोंद असून पोलिस त्याच्या मागावर होते. गुजरात हत्येप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस महेशच्या मागावर असताना पोलिसांना विकी पुण्यात लपला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवकर यांचे पथक 26 जानेवारी रोजी विकीला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ओळख लपवून वावरत असलेल्या विक्रांत उर्फ विकीला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात