मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्न समारंभात मोठा गोंधळ झाला. लग्नात हार घालण्याआधी नवरदेवाने फोटोग्राफरला कानाखाली मारल्याने परिस्थिती बिकट झाली. या घटनेमुळे दुःखी झालेल्या नवरीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि पोलीस ठाण्यात जाऊन नवरदेवावर हुंडा मागण्यासह अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबू घनश्याम नगर येथील रहिवासी असलेल्या या महिलेचं १४ जुलै रोजी गौरव माठे नावाच्या तरुणाशी लग्न ठरलं होतं. दोघेही एकमेकांना सुमारे दोन वर्षांपासून ओळखत होते, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने आता प्रेमविवाह करत होते. बुधवारी रात्री गौरव लग्नाच्या वरातीसह आला. लग्नाच्या विधी सुरू होणार असतानाच अचानक वाद निर्माण झाला.
स्टेजजवळ फोटो काढणारा तरुण थोड्यावेळाने नवरीजवळ उभा राहून पाणी पीत होता. यामुळे नवरदेव गौरव इतका संतापला की त्याने फोटोग्राफरला सर्वांसमोर कानाखाली मारली. अचानक झालेल्या या कृतीमुळे नवरी चिडली. तिने त्याच्या अशा वागण्याला विरोध केला आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती आणखी बिकट झाली. नवरीने अडवल्यावर गौरवने तिलाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतप्त नवरीने गौरवला स्टेजवरून उतरण्याचा आदेश दिला आणि म्हटलं की, ती अशा पुरुषाशी लग्न करणार नाही जो क्षुल्लक गोष्टींवरून तिच्या हात उचलेल.
दोन्ही पक्षांनी बराच वेळ गौरवला आणि नवरीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु नवरी तिच्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी, लग्नाची वरात लग्नाशिवाय परतली. त्यानंतर वधूने रात्री उशिरा एमजी रोड पोलीस ठाण्यात जाऊन वर गौरवविरुद्ध हुंडा मागणं, गैरवर्तन करणं, मारहाण करणं आणि जीवे मारण्याची धमकी देणं असा आरोप करत गुन्हा दाखल केला.
नवरीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार की, तिने १४ जुलै रोजी साखरपुड्यामध्ये सोन्याची अंगठी आणि ५१,००० रुपये दिले होते, परंतु लग्नाच्या दिवशी स्टेजवर पोहोचताच नवरदेवाकडेच्या लोकांनी सोन्याची मागणी करण्यास सुरुवात केली. मुलीच्या तक्रारीवरून, गौरव माठेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : In Indore, a groom slapped a photographer, leading the bride to call off the wedding. She filed a police complaint against the groom, alleging dowry demands and abuse, ending their two-year relationship.
Web Summary : इंदौर में, एक दूल्हे ने फोटोग्राफर को थप्पड़ मारा, जिससे दुल्हन ने शादी तोड़ दी। उसने दहेज मांगने और दुर्व्यवहार का आरोप लगाते हुए दूल्हे के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिससे उनका दो साल का रिश्ता खत्म हो गया।