शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
3
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
4
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
5
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
6
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
7
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
8
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
9
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
10
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
11
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
12
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
13
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
14
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
15
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
16
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
17
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
18
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
19
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
20
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरूणीला घेऊन पळाला नवरदेव, नवरीने पोलिसांकडे केली न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:19 IST

Groom run away with other girl on marriage day : हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेव पळून गेल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेव दुसऱ्याच तरूणीला घेऊन (Groom run away with other girl on marriage day) पळाला. ज्यामुळे नवरीच्या घरी एकच गोंधळ झाला. त्यानंतर नवरदेवाकडील लोकांनी फोन करून ते वरात आणत नसल्याचं सांगितलं. यासंबंधी तक्रार देण्यासाठी नवरी आणि तिची आई पोलीस स्टेशनमध्ये गेल्या.

हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांनी आपल्या दोन मुलींना वाढवण्यासाठी मोलमजुरी केली. मोठी मुलगी उषाचं लग्न चार वर्षाआधीच केलं होतं. तर लहान मुलगी २० वर्षीय अनीताचं लग्न कानपूर नगरच्या दर्शनपुरवामध्ये ठरलं होतं.

अनीताचं लग्न दर्शनपुरवा येथील राहुल वर्मासोबत जुळवण्यात आलं होतं. १० मे रोजी वरात येणार होती. ज्यासाठी दोन्ही घरात सर्व तयारी पूर्ण झाली होती. लग्नात सहभागी होण्यासाठी नातेवाईकही आले होते. रविवारी घरातील मंडपात रितीरिवाज होणार  होते. हळदीच्या कार्यक्रमात संगीत वाजत होतं. तेव्हाच नवरदेवाच्या नातेवाईकांनी फोन करून वरात आणणार नसल्याचं सांगितलं.

ऐनवेळी वरात आणण्यास नकार दिल्याने सगळे लोक हैराण झाले. नवरीची आई विद्या देवी यांनी सांगितलं की, नवरदेवाचा भाऊ अनिलने फोन माहिती दिली की, राहुल दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. त्यामुळे ते वरात आणू शकत नाही आणि त्याने फोन बंद केला.

मुलीला घेऊन आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्यांनी तक्रार दाखल केली. दोघींनी तक्रार दाखल करत पोलिसांकडे न्यायाची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रार दाखल करून घेतली आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी