शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दोस्त दोस्त ना रहा! लग्नाच्या १५ दिवसांपूर्वीच मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन ‘तो’ फरार झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 09:38 IST

अमितसोबत ब्रेक अप झाल्यानंतर युवती बादलच्या प्रेमात पडली. मागील ६ वर्षापासून बादल आणि युवतीचं प्रेम प्रकरण सुरू होतं

जोधपूर – मैत्री म्हटलं की विश्वासाचं नातं. या विश्वासाला तडा गेला तर मैत्रीला काहीच अर्थ नाही. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक अजब प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी लग्नाच्या १५ दिवस आधी युवकाने मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेला. या प्रकाराची पोलिसांना माहिती लागताच त्यांनी युवक आणि युवतीला शोधून काढत दोघांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. घडलेला प्रकार ऐकून मित्रांसह कुटुंबीयांनाही धक्काच बसला.

जोधपूरच्या रातानाडा परिसरातील ही घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एका कुटुंबाने त्यांच्या घरातील मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. नातेवाईकांनी तक्रारीत म्हटलं की, त्यांची मुलगी जी नर्सिंग करत होती. ती शुक्रवारपासून घरातून बेपत्ता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता मुलगी पाबुपुराचा रहिवासी असलेल्या बादल नायक नावाच्या युवकासोबत लग्नासाठी पळून गेली होती. बादल आणि युवतीला पोलिसांनी  शोधत चौकशी केली तेव्हा दोघंही लग्न करण्यासाठी घरातून पळाल्याचं त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

बादल नायक हा त्याचा मित्र अमित याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळाला होता. अमितसोबत ब्रेक अप झाल्यानंतर युवती बादलच्या प्रेमात पडली. मागील ६ वर्षापासून बादल आणि युवतीचं प्रेम प्रकरण सुरू होतं. परंतु याच काळात बादलचं लग्न ठरलं. १४ नोव्हेंबरला बादलच्या कुटुंबीयांना लग्न धुमधडाक्यात करण्याची तयारी सुरू केली. रातनाडा पोलीस ठाण्याचे पोलीस एसआय भंवर सिंह यांनी सांगितले की, बादल याचं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं. त्या मुलीने बादलविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्याचसोबत रागाच्या भरात होणाऱ्या नवरीनं पोलीस ठाण्यात येऊन बादलला कानशिलात लगावली. पोलिसांनी हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणात बादलविरोधात फसवणुकीचाही गुन्हा नोंदवला आहे.

बादल याचं लग्न ठरल्यानंतर त्याने युवतीसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवती आणि बादलनं एकमेकांशी फोनवर संवाद साधत घरातून पळून लग्न करूया असं ठरवलं. बादल आणि युवती घरातून पळून लग्न करणार होते. परंतु शनिवार असल्याने त्यांना लग्न करता आलं नाही. युवतीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी सर्च करत दोघांना ताब्यात घेतलं.  

 

टॅग्स :marriageलग्नRajasthanराजस्थान