लातूर : आर्थिक विवंचनेतून एका किराणा दुकानदाने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना लातुरातील एलआयसी काॅलनीत मंगळवारी पहटाेच्या सुमारास घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. उल्हास रावसाहेब पाटील (४५) असे मयत दुकानदाराचे नाव आहे.पाेलिसांनी सांगितले, मयत उल्हास रावसाहेब पाटील (रा. प्रगती नगर, एलआयसी काॅलनी, लातूर) यांचे परिसरात किराणा दुकान आहे. ते गेल्या काही वर्षांपासून किराणा दुकानाचा व्यवसाय करत हाेते. दरम्यान, काेराेनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर त्यांच्या व्यवायाला घरघर लागली हाेती. यातूनच त्यांच्या डाेक्यावर कर्जाचा डाेंगर वाढत गेला़ दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्जाची परतफेड कशी करायची? याच विवंचनेतून ते अलिकडे तणावात हाेते. काही दिवासांपासून ते घरात काेणालाही फारसे बाेलतही नव्हते. अखेर आर्थिक विवंचेनतूत त्यांच्यामध्ये नैराश्य आले. याच नैराश्यातून त्यांनी मंगळवारी पहाटे एलआयसी काॅलनी परिसरात असलेल्या एका मंदिरानजीक लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपविले. ही घटना सकाळी समाेर आली. याबाबत आनंद बाबासाहेब जाधव (रा. प्रगती नगर, एलआयसी काॅलनी, लातूर) यांनी विवेकानंद चाैक पाेलिसांना माहिती दिली. पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. कर्जबाजारीपणामुळे उल्हास पाटील यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे, असे पाेलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस कर्मचारी सय्यद करीत आहेत.दिवाळी आले हाेते आई-बाबा...मयत उल्हास पाटील यांचे वृद्ध आई-बाबा गावाकडून दिवाळी सणानिमित्ताने लातुरात आले हाेते. दरम्यान, मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याने त्यांच्यावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-बाबा, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आत्महत्या करण्यापाठिमागचे खरे कारण कुटुंबियांच्या जबाबातून समाेर येणार आहे, असे तपासिक अंमलदार सय्यद यांनी सांगितले.
किराणा दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून लातुरात केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 22:10 IST
Suicide Case : याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस कर्मचारी सय्यद करीत आहेत.
किराणा दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून लातुरात केली आत्महत्या
ठळक मुद्दे उल्हास रावसाहेब पाटील (४५) असे मयत दुकानदाराचे नाव आहे.