शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

धक्कादायक! छोट्या बहीणीला छेडछाडीपासून वाचवायला गेली; गुंडांनी मोठ्या बहीणीलाच पळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 12:07 IST

Crime News: दादरी येथील सादोपूर गावात ही घटना घडली आहे. गुंडांनी पळविलेली तरुणी ही कॉलेजमध्ये शिकते. बीएच्या शेवटच्या वर्षाला आहे.

गुन्हेगारीची राजधानी बनलेल्या उत्तर प्रदेशमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. ग्रेटर नोएडामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या विद्यार्थिनीची कारमधून आलेल्या काही अज्ञात गुंडांनी छेड काढली. हे तिच्या मोठ्या बहीणीने पाहिले, ती तिला वाचविण्यासाठी गेली असता त्या गुंडांनी मोठ्या बहीणीलाच उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेविरोधात पीडितेच्या कुटुंबियांनी महामार्ग अडविला आहे. (Shocking! Went to save the younger sister from molestation; The goons kidnapped the elder sister)

दादरी येथील सादोपूर गावात ही घटना घडली आहे. गुंडांनी पळविलेली तरुणी ही कॉलेजमध्ये शिकते. बीएच्या शेवटच्या वर्षाला आहे. व्हॅनमधून आलेल्या तीन गुंडांनी तिचे अपहरण केले आहे. सादुल्लापुर रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली. ही तरुणी तीन छोट्या बहीण, भावासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. तेथून परतत असताना एका कारमधून आलेल्या गुंडांनी तिच्या छोट्या बहीणीची छेड काढली. त्यांना जाब विचारायला गेलेल्या मोठ्या बहीणीला या गुंडांनी पळवून नेले. या गुंडांनी आधी छोट्या बहीणीला पळविण्याचा प्रयत्न केला. तिला तिने गुंडांच्या तावडीतून सोडविले. परंतू ती स्वत: या गुंडांच्या तावडीत सापडली. 

घटनेनंतर लगेचच पोलिसांना याची खबर देण्यात आली. पोलिसांनी येत अपहृत मुलीचा आणि गुंडांचा शोध सुरु केला आहे. महत्वाचे म्हणजे या मुलींचे वडील हे माजी जिल्हा पंचायत सदस्य आहेत. मोठ्या मुलीचे नाव स्वाती आहे. ती तिची धाकटी बहीण आणि दोन भावांसोबत सकाळी फिरायला गेली होती. स्वातीच्या अपहरणामुळे आजबाजुच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगUttar Pradeshउत्तर प्रदेश