नात्याला काळिमा! आजीने केली नातीची हत्या; पोलिसांकडून अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:35 PM2019-09-30T16:35:42+5:302019-09-30T16:37:56+5:30

आजीला आज अटक केली आहे. 

Grandmother murdered granddaughter; Arrested by police | नात्याला काळिमा! आजीने केली नातीची हत्या; पोलिसांकडून अटक  

नात्याला काळिमा! आजीने केली नातीची हत्या; पोलिसांकडून अटक  

Next
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सबळ पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी आजीला आज अटक केली आहे. 

मुंबई - मालाड येथील कुरार परिसरात सख्ख्या आजीनेच नातीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, नंतर ही हत्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सबळ पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी आजीला आज अटक केली आहे. अटक आजीचे नाव रुक्सना अन्सारी (५०) असं आहे. 

२८ सप्टेंबर रोजी २ वर्षीय जिया या चिमुकलीचा इमारतीच्या ६ व्य मजल्यावर पडून मृत्यू झाल्याने कुरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र घटनास्थळाची बारकाईने पोलिसांनी पाहणी केल्याने आणि शवविच्छेदनाचे अहवालानंतर मुलीची हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत असताना मयत किचनच्या खिडकीतून पहाटे ५. ३० ते ५. ४५ वाजताच्या दरम्यान कोणीतरी खाली फेकल्याचे स्पष्ट झाले. घराची खिडकी बंद होती आणि  उख्य दरवाजा देखील बंद होता. यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि अधिक चौकशीत आजीने हत्या केल्याचे लक्षात आले. त्यानंतर आज रुक्सना यांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Grandmother murdered granddaughter; Arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.