शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलिसांनी केली अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 14:57 IST

तुमच्या मालकाने पैसे देण्यास सांगितल्याचे खोटे सांगून बनावट चेक देऊन २ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़.

ठळक मुद्दे८ गुन्हे उघडकीस : यापूर्वी विविध राज्यात २० गुन्हेसीसीटीव्ही फुटेजवरुन पटली ओळख  

पुणे : तुमच्या मालकाने पैसे देण्यास सांगितल्याचे खोटे सांगून बनावट चेक देऊन २ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़. अब्बास सैफुद्दीन उकानी ऊर्फ दत्तात्रय सोनु शिंदे (वय ४४) आणि मुकेश परमेश्वर मेमन (वय ५४, दोघे रा़. वसई ईस्ट,जि. पालघर) अशी त्यांची नावे आहेत़. त्यांच्याकडून शिक्रापूर, शिरुर तसेच औरंगाबाद, नाशिक, सांगली येथील ८ गुन्हे उघडकीस आले आहेत़. त्यांनी यापूर्वी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, प़ बंगाल, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यात २० हून अधिक गुन्हे केले असून त्यासाठी विमानाने फिरत असल्याची माहिती समोर आली आहे़. शिक्रापूर गावातील बँकेतून २ लाख रुपये एकाने काढले असताना त्याच्याजवळ एक जण आला व त्याने बँक आॅफ महाराष्ट्राचा चेक त्यांना दिला व तुमच्या मालकाने मला पैसे देण्यासाठी सांगितले आहे, असे सांगून फसवणूक त्यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन गेला होता़. २७ सप्टेंबरमध्ये ही घटना घडली होती़. अशाप्रकारे शिरुर पोलीस ठाण्यात ५ नोव्हेंबर २०१८ ला गुन्हा दाखल झाला होता़. स्थानिक गुन्हे शाखा याचा तपास करीत असताना त्यांना अशाप्रकारचे गुन्हे औरंगाबाद, नाशिक, सांगली, पुणे शहरात घडल्याचे आढळून आले होते़. त्या ठिकाणचे सी़ सी़ टी़ व्ही़ फुटेजची माहिती संकलित करुन त्याचा तपास करताना अब्बास उकानी व मुकेश मेमन यांनी अशा प्रकारे गुन्हे गुजरात मध्ये केले असून ते रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती मिळाली़. दमण येथील पोलिसांनी त्यांना अटक केली होती़. सीसीटीव्ही फुटेमध्ये आढळलेले आरोपी आणि प्रत्यक्ष अटक केलेल्या आरोपी एकच असल्याचे दिसून आले़.फिर्यादींनी यांनीच चेक दिल्याचे सांगितले़ ते चेक त्यांनी चोरलेले होते़. त्याचा तपास करीत असताना दोघे जण शिक्रापूर परिसरात जीपने येणार असल्याची माहिती मिळाली़. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या गाडीत ८० हजार रुपये मिळाले़. जीपसह ५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़. शिक्रापूर, शिरुर तसेच औरंगाबादमधील सिडको एमआयडीसी, क्रांती चौक, वेदांतनगर पोलीस ठाणे तसेच नाशिकमधील आडगाव, भद्रकाली पोलीस ठाणे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अशाप्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत़.  अधिक तपासासाठी त्यांना शिक्रापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक