गोरेगाव बलात्कार प्रकरण : फरार आरोपीचे स्केच जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2022 14:00 IST2022-08-10T14:00:28+5:302022-08-10T14:00:54+5:30

स्केच मधील संशयीत आरोपी कुणाला दिसल्यास याची माहिती पोलिसांना द्यावी

Goregaon rape case: Sketch of fugitive accused released | गोरेगाव बलात्कार प्रकरण : फरार आरोपीचे स्केच जारी

गोरेगाव बलात्कार प्रकरण : फरार आरोपीचे स्केच जारी

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ३५ वर्षाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी फरार असल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या माहितीनुसार आरोपीचे स्केच तयार केले आहे. हे स्केच बुधवारी (दि.१०) बुधवारी जारी केले आहे. 

तयार करण्यात आलेल्या स्केच मधील संशयीत आरोपी कुणाला दिसल्यास याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी केले आहे. संशयित आरोपी ३५ ते ४० वर्ष वयोगटातील आहे. आरोपी सावळ्या रंगाचा, मध्यम बांधा, केस काळे, हलकी दाढी व डाव्या हातात जर्मन कडा, डाव्या हाताच्या बोटांमध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढऱ्या रंगाच्या शर्ट, सॅंडल चप्पल परिधान केलेला आहे. बोलण्याचा आवाज मोठा असे त्याचे वर्णन आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील या आरोपीचा अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा कामाला लागला आहे.

Web Title: Goregaon rape case: Sketch of fugitive accused released