केतकी चितळेचा गोरेगाव पोलीस घेणार ताबा?, जामीन अर्जावर थोड्याच वेळात होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 02:07 PM2022-05-18T14:07:22+5:302022-05-18T18:46:47+5:30

Ketaki Chitale : शरद पवार यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे आज पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.

Goregaon police taken Ketaki Chitale into custody, bail application to be heard shortly | केतकी चितळेचा गोरेगाव पोलीस घेणार ताबा?, जामीन अर्जावर थोड्याच वेळात होणार सुनावणी

केतकी चितळेचा गोरेगाव पोलीस घेणार ताबा?, जामीन अर्जावर थोड्याच वेळात होणार सुनावणी

Next

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाकडून कोठडी देण्यात आली असून गोरेगाव पोलीसांनी केतकीचा ताबा अद्याप देण्यात आलेला नाही.  

शरद पवार यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे आज पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. तिच्या बाबतीत या पूर्वीच मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी ताबा मागितल्यावर त्यांना ताबा दिला होता. मात्र, ठाणे जेलमधून तिचा ताबा घेता आला नव्हता. थोड्या वेळापूर्वी ती ठाणे जेल आवारात होती. पोलिसांना केतकीच्या जामिनाबाबतीत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सांगावे असं न्यायालयाने सांगितलं आहे. तोपर्यंत जामीन अर्जावर सुनावणी होणार नव्हती. केवळ सायबर कलम ६६ अ अन्वये युक्तिवाद  झाला आहे. केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी  बाजू मांडली. केतकीच्या जामीन अर्जावर अजून निर्णय झालेला नसल्याने गोरेगाव पोलिसांना ताबा घेता आला नाही. 

जे.जे. रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करुन आणतांना तिला उशिर झाला. त्यामुळे गोरेगाव पोलिसांना परत जावे लागले आहे. आता ते गुरुवार किंवा शुक्रवारी तिचा ताबा घेऊ शकणार आहेत. तसेच तिच्या जामीन अर्जावर देखील दोन दिवसात सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारची रात्र केतकी हिला ठाणे कारगृहात काढावी लागणार आहे.

Web Title: Goregaon police taken Ketaki Chitale into custody, bail application to be heard shortly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.