शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पोलिसांचा कारनामा! ड्युटी संपल्यावर उरलेल्या वेळात लूट; ३५ लाखांचे दागिने घेऊन फरार

By कुणाल गवाणकर | Published: January 22, 2021 2:03 PM

पोलीस उपनिरीक्षकच निघाला टोळीचा म्होरक्या; एकूण सहा जणांच्या मुसक्या आवळल्या

गोरखपूर: सराफा व्यापाऱ्यांकडून ३५ लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गोरखपूर पोलीस आणि गुन्हे शाखेनं संयुक्तपणे ही कारवाई केली. या प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे.गोरखपूरमध्ये पोलिसांनीच लूटमार केल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची सविस्तर माहिती डीआयजी जोगिंदर कुमार यांनी दिली. 'बस्ती जिल्ह्यातल्या पुरानी बस्ती पोलीस ठाण्यात तैनात असलेले आणि गोरखपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकरीगंजमध्ये राहणारे उपनिरीक्षक धर्मेंद्र यादव यांना लूट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तेच या टोळीचे प्रमुख आहेत. याशिवाय मऊ जिल्ह्यातल्या डीह गावात राहणारे शिपाई महेंद्र यादव आणि गाजीपूर जिल्ह्यातल्या जंगीपूरमध्ये वास्तव्यास असलेले शिपाई संतोष यादव यांना अटक करण्यात आली आहे,' असं कुमार यांनी सांगितलं. एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन शिपायांसह त्यांच्यासोबत असणारा बुलेरो गाडीचा चालक देवेंद्र यादव, व्यापाऱ्यांची माहिती देणारा शैलेश यादव आणि त्याचा साथीदार दुर्गेश अग्रहरी यांच्यादेखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 'महाराजगंजमधील निचलौल भागात वास्तव्यास असलेले व्यापारी दीपक वर्मा आणि रामू वर्मा २० जानेवारीला रोडवेजच्या बसनं लखनऊला जात होते. त्यावेळी पोलिसांच्या गणवेशात असलेल्या धर्मेंद्र यादव, महेंद्र यादव आणि संतोष यादव यांनी केंट परिसरातील रेल्वे स्थानक आणि नौसड दरम्यान व्यापाऱ्यांना बसमधून खाली उतरवलं,' असा घटनाक्रम कुमार यांनी सांगितला.तुम्ही बाळगत असलेली सोनं आणि चांदी अवैध आहे. या प्रकरणात तपास करावा लागेल, असं म्हणत तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना रिक्षात बसवलं आणि त्यांच्याकडे असलेली ३५ लाखांचं सोनं आणि चांदी घेऊन फरार झाले. व्यापाऱ्यांना वर्दीतील पोलिसांचा संशय आला. त्यांनी याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माध्यमातून शोध सुरू केला आणि २४ तासांच्या आत लूटमार प्रकरणाचा छडा लावला. 

टॅग्स :Policeपोलिस