शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"घरी जा आणि मृतदेह उचला"; बायकोला संपवलं, पोलीस स्टेशन गाठलं, २ वर्षांपूर्वी केलेलं लव्हमॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:29 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका तरुणाने पत्नीची हत्या करून पोलीस स्टेशन गाठलं.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका तरुणाने पत्नीची हत्या करून पोलीस स्टेशन गाठलं. "मी पत्नीची हत्या केली आहे. त्यामुळे घरी जा आणि मृतदेह उचला" असं त्याने पोलिसांना सांगितलं. हे ऐकून पोलीस हैराण झाले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घाईघाईने घटनास्थळी पोहोचली तेव्हा आरोपीच्या पत्नीचा मृतदेह खोलीतील बेडवर पडलेला होता. जमिनीवर रक्त होतं.

तरुणाने २ वर्षांपूर्वी घरासमोर राहणाऱ्या एका मुलीशी लव्हमॅरेज केलं होतं. आता दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याने तिची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तो एक तास मृतदेहाजवळ बसून राहिला. त्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अंगद शर्मा असं तरुणाचं नाव आहे. कर्नाटकात सुतार म्हणून काम करतो. 

अंगदने दोन वर्षांपूर्वी नेहासोबत लव्हमॅरेज केलं होतं. नेहाचे घर अंगदच्या घरासमोर आहे. कुटुंबाने लग्नाला विरोध केला तेव्हा दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्नानंतर अंगद त्याची पत्नी नेहासोबत कर्नाटकला गेला. काही दिवसांनी तो गावी परतला. तिथे नेहा एका एजन्सीमध्ये काम करू लागली. दोन महिन्यांपूर्वी अंगद परत आला तेव्हा त्याने त्याची पत्नी मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असल्याचं पाहिलं.

तू कोणाशी बोलत आहेस? असा प्रश्न विचारला. तेव्हा नेहाने कंपनीच्या प्रोजेक्टबद्दल बोलत असल्याचं सांगितलं. त्यानंतर ते दररोज भांडू लागले. ३ जून रोजी रात्री अंगदचं नेहाशी भांडण झालं. त्यानंतर दोघेही झोपले. सकाळी उठून त्याने नेहावर हल्ला केला. तिचा गळा चिरला. तो मृतदेहाजवळ एक तास बसून राहिला. अखेर त्याने नंतर पोलीस स्टेशन गाठलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस