शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

Goldy Brar Detained: सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड; गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक, CM भगवंत मान यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:29 IST

Goldy Brar Detained: प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार याला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आले आहे.

Goldy Brar Detained: प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार याला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही माहिती दिली आहे. भगवंत मान यांनी सांगितले की, गँगस्टर गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, पंजाबमध्ये गन कल्चर संपेल, असाही दावा मान यांनी केला. 

इंटरपोलने काही काळापूर्वी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. गोल्डी ब्रारवर भारतात 16 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो भारतातून कॅनडाला पळून गेला, पण काही काळापूर्वी त्याने कॅलिफोर्नियाला आपला नवीन अड्डा बनवला होता. 29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या झाली होती. मुसेवालाच्या हत्येचा सूत्रधार गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई आहेत. गोल्डी ब्रारला कॅनडात धोका जाणवला, त्यामुळेच तो कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो शहरात राहू लागला.

ब्रार एफबीआयच्या तावडीतपंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथे राहणारा सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार 2017 मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडाला गेला होता. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय एजन्सी त्याचा शोध घेत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने गोल्डी ब्रारला ताब्यात घेतले आहे. गोल्डीला आता कधीही भारतात आणले जाऊ शकते. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी