शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त शिक्षिकेच्या घरातून तब्बल ६१ तोळं सोनं चोरीला, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 22:20 IST

Crime News :घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला.

फलटण - एक दोन नव्हे तर तब्बल ६१ तोळं सोन चोरीला गेल्याने फलटण तालुक्यातील कोळकी येथे प्रचंड खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त असलेल्या एका शिक्षिकेच्या घरात ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. बॅंकेतील लॉकरवर आमचा विश्वास नव्हता म्हणून घरातच सोनं ठेवलं, असं त्या सेवानिवृत्त शिक्षिका पोलिसांना सांगितलं आहे.  याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहरानजीक कोळकी गावच्या हद्दीतील शारदानगर येथील कस्तुरा सीताराम माळी (वय ६३) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांच्या घरामध्ये त्या आणि त्यांची बहीण राहत आहे. 

दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले त्यांचे व त्यांची बहीण शकुंतला यांचे ६१ तोळे सहा ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे सर्व दागिने चोरून नेले. या दागिन्यांची किंमत तब्बल १४ लाख रुपये होती. दरम्यान, शनिवारी सकाळी त्या घरी आल्या असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 

पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी घटनास`थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पाहणी केली. तसेच सातारहून श्वानपथक मागविण्यात आले होते. फलटण शहर पोलीस स्टेशनचा मोठा पोलीस फौजफाटा तपासाच्या दृष्टीने विविध ठिकाणी शोध घेत आहे. या घटनेची फिर्याद कस्तुरा माळी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनंPoliceपोलिस