शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, गणेशोत्सवाच्या धामधुमीत रविवार पेठेत भरदुपारी घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 23:12 IST

Crime News: गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाच्या बॅगमधून तब्बल १ कोटी २० कोटी रुपयाचे ३ किलो ३१९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले.

पुणे - शहरात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाच्या बॅगमधून तब्बल १ कोटी २० कोटी रुपयाचे ३ किलो ३१९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी व्यावसायिकाने दोन महिला व एका लहान मुलावर संशय व्यक्त केला आहे.याबाबत जिगेश नरेशकुमार बोराणा (वय ३३, रा. घाटकोपर, पश्चिम, मुंबई) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बोराणा हे त्यांचे मित्र मुकेश चौधरी यांच्यासह दागिने घेऊन पुण्यात आले होते. ते शहरातील विविध ज्वेलर्संना दागिने पुरवितात. त्यांच्याकडे एकूण ६ प्लॉस्टिक बॉक्समध्ये ६ किलो ९९ ग्रॅम वजनाचे दागिने होते. (Gold jewelery worth Rs 1.25 crore stolen)

 रविवार पेठेतील राजमल माणिकचंद ज्वेलर्स येथे ते दागिने दाखविण्यासाठी आले होते. दुकानातील आतील रुममध्ये त्यांनी दुकानातील मुकेश कुंवर या सेल्समनला सोन्याचा माल दाखविला. त्यातील एक मंगळसुत्राचे डिझाईन पसंद करुन त्यांनी कश काऊंटरवर ऑर्डर देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कॅश काऊंटरजवळ येऊन दुकानाचे मालक पन्हालाल छाजेड यांना मंगळसुत्र दाखविण्यासाठी बोराणा यांनी त्यांच्याकडील सॅकमधून फक्त मंगळसुत्र काढून दाखविले. त्यानंतर त्यांनी ते मंगळसुत्र पुन्हा सॅकमध्ये ठेवले. ते छाजेड यांच्याशी बोलत असताना त्यांच्या शेजारी एक महिला येऊन थांबली होती.

तिच्यामागे दुसरी महिला व एक लहान मुलगा होता. शेजारी उभ्या असलेल्या महिलेने तोंडाला बांधलेला स्कॉर्फ सॅकवर टाकला. स्कॉर्फ घेताना तिने वरच्या बाजूला ठेवलेला सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरुन नेला. हा प्रकार लक्षात आल्यावर बोराणा यांनी बाहेर येऊन त्या महिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या गर्दीत दिसेनाशा झाल्या.त्या बॉक्समध्ये १ कोटी २० लाख रुपयांचे ३ किलो ३१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे