शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर महिलेकडून सोन्याची बिस्कीटे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:21 IST

गोवा येथून विमानाने आलेला महिला प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने १८ लाख ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत..

पुणे : गोवा येथून विमानाने आलेला महिला प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने १८ लाख ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. हे सोने बँकाक येथून तस्करी करण्यात आल्याचा संशय आहे. अलीकडच्या काळात देशांतर्गत विमानातील प्रवाशाकडून तस्करी केल्याची ही पहिलीच घटना आहे. उषा सिंग असे या महिला प्रवाशाचे नाव आहे. स्पाईस जेट कंपनीच्या विमानातून ती दि. १० जुलै रोजी गोवा येथून पुणेविमानतळावर आली. विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या महिलेची तपासणी केली. या तपासणीमध्ये महिलेकडे ५५७.६४ ग्रॅम वजनाची सोन्याची तीन बिस्किीटे आढळून आली. त्याची किंमत १८ लाख ९० हजार ४०० रुपये एवढी आहे. या बिस्कीटांना काळ्या रंगाची चिकटपट्टी लावून तिने आपल्या बुटामध्ये लपविले होते. ही महिला प्रवासी गोव्यातून विमानात बसली असली तरी हे सोने बँकाकवरून आल्याचा संशय आहे. गोव्यातून पुण्यात आलेल्या विमानाचा मार्ग बँकाक ते कोलकाता होता. कोलकातामध्ये आल्यानंतर हे विमानाची देशांतर्गत वाहतुक सुरू झाली. कोलाकाता-बंगलुरू-गोवा-पुणे असा या विमानाचा मार्ग होता.विमानातील स्वच्छतागृहामध्ये सोने लपवून ठेवण्यात आले होते. संबंधित महिला गोव्यात विमानात चढल्यानंतर तिने हे सोने काढून बुटामध्ये लपविले. या बिस्कीटांवर मेटालर, सिंगापुर असे लिहिले आहे, अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली. हे सोने बँकॉकमध्ये लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही वर्षात पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानातून सोन्याची तस्करी झाल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. विमानतळावरून दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांकडून सोन्याची तस्करी अनेक पकडण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ------------

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळGoldसोनंSmugglingतस्करीPoliceपोलिस