पिंपरी : तांबे-पितळाचे भांडे पॉलिश करण्याची उजाला पावडर असल्याची बतावणी केली. हाताला कसलातरी रंग लावून हातचलाखीने ७५ हजारांच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्या. दिघी येथे गुरुवारी (दि. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनुसया मारूतल पोवार (वय ४६, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. फियार्दी अनुसया पोवार यांना गुरुवारी दोन अनोळखी आरोपींनी भांडे घासण्याची पावडर असल्याचे सांगितले. तांबे व पितळाचे भाडे पॉलीश करण्याची ती उजाला पावडर असल्याची बतावणी केली. त्यानंतर हाताला कसलातरी रंग लावून हातचलाखीने ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्या. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
दिघीत महिलेच्या बांगड्यांची हातचलाखीने चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:08 IST