गोव्यातील शाळकरी मुलाचे देशविरोधी कारवायांत कनेक्शन?; NIA कडून मोबाईल जप्त
By वासुदेव.पागी | Updated: September 14, 2023 17:51 IST2023-09-14T17:51:19+5:302023-09-14T17:51:36+5:30
देशविरोधी कारवायांत गुंतलेल्यांचा शोध घेताना उदगाव येथील एका दहावीच्या विद्यार्थ्यांचा संबंध आढळून आल्याने एनआयएने ही कारवाई केली

गोव्यातील शाळकरी मुलाचे देशविरोधी कारवायांत कनेक्शन?; NIA कडून मोबाईल जप्त
पणजी - राष्ट्रविघातक कारवायांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे पथक गोव्यात दाखल झाले असून उचगाव येथील एका शाळकरी मुलाची मोबाईल पथकाने जप्त केला आहे.
देशविरोधी कारवायांत गुंतलेल्यांचा शोध घेताना उदगाव येथील एका दहावीच्या विद्यार्थ्यांचा संबंध आढळून आल्याने एनआयएने ही कारवाई केली. मुलाचा केवळ मोबाईल जप्त करण्यात आला आहे आणि नंतर येणारे पथक माघारी परतले. हा मुलगा मूळचा उत्तर प्रदेशमधील असून गेल्या दहा वर्षांपासून तो कुटुंबासह गोव्यात आहे. एनआयएनेदेशविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात विविध राज्यांमध्ये संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत या मुलाविषयी माहिती मिळाल्यामुळे हे पथक गोव्यात दाखल झाले होते.
या मुलाची एनआयए पथकाने कसून चौकशी केली. हा मुलगा सोशल मीडियावरही खूप सक्रिय होता. त्याचे सर्व पोस्टही येणारे पथकाने पाहिले आहेत. या कारवाईसाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी फोंडा पोलिसांची मदत घेतली. मात्र गोवा पोलिसांना या मुलाच्या कारवाया विषयी काहीच माहिती नव्हती.