शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आलिशान गाडीतून अवैध वाहतूक होणारी दीड लाखांची गोव्याची दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By appasaheb.patil | Updated: February 26, 2023 17:34 IST

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या करमाळा यथील पथकाचे दुय्यम निरीक्षक शंकर पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील नेर्ले गावाच्या हद्दीत पाळत ठेवली होती...

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करमाळा तालुक्यातील नेर्ले गावच्या हद्दीत एका आलिशान कारमधून १ लाख ५३ हजार ६०० रूपये किंमतीचे गोवा राज्यातील दारू जप्त केली आहे.  

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या करमाळा यथील पथकाचे दुय्यम निरीक्षक शंकर पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील नेर्ले गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता त्यांना एका अलिशान एमएच ४८ पी ०३८८ या चारचाकी वाहनातून गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेले १८० मिलीच्या ९६० बाटल्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले. 

या गुन्ह्यात त्यांनी वाहन चालक निलेश लालासाहेब पडवळे (वय ३१ वर्षे, रा. उमरड, ता.करमाळा) याला  ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यात अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस काेठडी सुनावली आहे. या कारवाईत निरिक्षक सदानंद मस्करे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, महावीर कोळेकर, जवान अनिल पांढरे यांनी सहकार्य केले. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी