शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी शहरात चार गाड्यांच्या काचा फोडल्या; कारण मात्र अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:54 IST

Crime News : एक कार कोल्हापूर येथील पोलिस अधिकाऱ्यांची

ठळक मुद्दे पोलिसांनी घटनेनंतर सावंतवाडी शहरातील सीसीटिव्ही द्वारे आरोपी चा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण आरोपी सापडला नाही.

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील अंतर्गत रस्त्यावर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या चार गाड्याचा काचा अज्ञातांकडून दगड मारून फोडण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे.यातील तीन गाड्या या स्थानिक नागरिकांच्या आहेत तर एक गाडी  कोल्हापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची असल्याचे पुढे येत आहे.या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून,पोलिस सीसीटिव्हीच्या आधारे युवकांचा शोध घेत आहेत.

सावंतवाडी शहरात प्रथमच सालईवाडा परिसरात लावण्यात आलेल्या गाड्यावर दगडफेकीचा प्रयत्न झाला यातील चार गाड्याच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे हा प्रकार मध्यरात्रीच्या वेळी धडला आहे.ज्या व्यक्तीने गाडीवर दगड मारून काचा फोडल्या त्याला काहि नागरिकांनी बघितल्याचे सांगण्यात येत आहे.तर हा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर याबाबत पोलिस ठाण्यात रितसरा तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनेनंतर सावंतवाडी शहरातील सीसीटिव्ही द्वारे आरोपी चा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण आरोपी सापडला नाही.  तसेच या प्रकरणी दोघांनी रितसर तक्रार दिली आहे.विशेष म्हणजे यातील एका गाडी ही कोल्हापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची असल्याचे पुढे आले आहे.घटने नंतर  राष्ट्रवादीचे व्यापार सेलचे कार्याध्यक्ष हीदायतुल्ला खान यांनी सांगितले कि परिसरात सीसीटीव्ही नसल्याचा फायदा घेऊन काही काहि युवकांनी हा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी,अशी मागणी खान यांनी केली आहे.

आपण घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली या वेळी दुचाकीवरून रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास आलेल्या एका युवकाने हा प्रकार केल्याचा तेथील स्थानिक नागरिकांचा संशय आहेत काही लोकांनी त्याला पाहिले आहे तो दुचाकी घेऊन त्या ठिकाणी आला होता त्याने दगड घेऊन हा प्रकार केला असे येथील एका महिलेने सांगितले त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी खान यांनी मागणी केली आहे. पोलिस निरिक्षक शशीकांत खोत यांनी घडल्या प्रकार बाबत आम्ही चौकशी करत असून,लवकरच आरोपीला अटक करू दगड मारण्या मागचे कारण समजू शकले नाही दोघांनीही तक्रार दिली असून, अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे खोत म्हणाले.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीPoliceपोलिसcarकारkolhapurकोल्हापूर