शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बोगस वैद्यकीय चाचणी अहवाल देऊन एलआयसीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 00:11 IST

या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम 465, 468, 471, 473, 474, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण पुढील तपासासासाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.

मुंबई - एलआयसीच्या आरोग्य विम्यासाठी पूर्ववैद्यकीय चाचणी अहवाल देणाऱ्या वाकोल्यातील डॉक्‍टरसह दोघांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींकडून डॉक्‍टर व शुश्रूषागृहांच्या नावांचे बनावट शिक्के पोलिसांनी हस्तगत केले आहेत. डॉक्‍टर राकेशकुमार दुग्गल व तंत्रज्ञ किशोर सकपाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुग्गल याचे वाकोला पश्‍चिम येथे "दत्तात्रय नर्सिंग होम' आहे. या शुश्रूषागृहात आरोग्य विम्यासाठी आवश्‍यक असलेल्या पूर्ववैद्यकीय चाचणीचे बनावट अहवाल देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-8 मधील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी तपासणी केली असता, एका खोलीत वैद्यकीय अहवाल तयार केले जात असल्याचे आढळले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून डॉक्‍टर  नावांचे बनावट शिक्के, बनावट वैद्यकीय कागदपत्रे व संगणकाची हार्ड डिस्क असा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्या ठिकाणी एका शुश्रूषागृहात होणाऱ्या तणावावरील चाचणीचा बनावट अहवालही सापडला. त्यानुसार दुग्गल व सकपाळ यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम 465, 468, 471, 473, 474, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण पुढील तपासासासाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMedicalवैद्यकीय