शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के द्या... म्हणत कंत्राटदाराला धमकी; भाजप नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 13:49 IST

Crime News : नवघर पोलिसांनी केणी यांच्या मुलासह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मनीषा म्हात्रे

मुंबई : टेंडर मागे घ्या नाही तर ५० टक्के द्या म्हणत,  सिव्हिल कंत्राटदाराला भाजप नगरसेविका रजनी केणी यांच्या कार्यालयात डांबून त्यांच्या मुलाकडून दमदाटी करत धमकावल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी केणी यांच्या मुलासह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.म्हाडा परिसरात राहणारे तक्रारदार संकेत हिर्लेकर (३७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पालिकेच्या ऑनलाइन ई-टेंडरव्दारे वॉर्ड क्रमांक १०५ मधील दोन कामे मिळाली. काम मिळाल्यानंतर ४ डिसेंबर रोजी काॅन्ट्रॅक्टर मनोज जाधवने कॉल करून टेंडर मागे घेण्यास सांगितले.  त्यापाठोपाठ केणी यांचा मुलगा नमित केणी याने कॉल  करून भेटण्यास बोलावले. त्यानुसार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केणी यांच्या कार्यालयात गेल्यानंतर रजनी केणी यांची भेट झाली. त्यांना अमितच्या कॉलबाबत सांगताच, नमित मुलगा असून,  तोच सर्व सिव्हिल काॅन्ट्रॅक्टर काम पहात असल्याचे सांगून त्यांनाच भेटण्यास सांगितले.काही वेळाने तेथे आलेल्या नमित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना मिळालेले काम आधीच पूर्ण केले असल्याचा दावा केला.  टेंडर मागे घेत असल्याबाबत लेटर तयार करून सही करण्यास सांगितले. नकार देताच, बनावट सही करून जबरदस्ती कारमध्ये बसवून टी वाॅर्ड कार्यालयात नेत अर्ज देण्यास भाग पाडले. 

एकाने केली बनावट स्वाक्षरीअर्जावर सही करण्यास नकार देताच,  त्यातील एकाने बनावट सही केली. त्यानंतर टेंडरची ५० टक्के रक्कम द्या नाही तर काम सोडा असे सांगितले. 

नगरसेविका म्हणे, मला काहीच माहिती नाहीयाबाबत नगरसेविका रजनी केणी यांच्याकडे विचारणा करताच आपल्याला काहीही माहिती नसून आपण मुलाच्या लग्नात व्यस्त असल्याचे सांगितले. तसेच गुन्हा दाखल झाला आहे हेदेखील आताच समजल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

एकाला अटक : याप्रकरणी नगरसेविकेच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्याला दुजोरा देत मनोज जाधवला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिसfraudधोकेबाजी