शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:57 IST

तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुझे लग्न होऊन देणार नाही. मी सर्वांकडे तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली.

ठळक मुद्देतरुणावर गुन्हा दाखल, कोळीये येथील घटना

चाकण : लग्नासाठी वेळोवेळी तरुणीला मेसेज करून, तुझी बदनामी करीन व ठरलेले लग्न मोडील, अशी धमकी देऊन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (दि. ३ एप्रिल ) रोजी सकाळी साडे अकराच्या पूर्वी कोळीये येथील फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.  नयना रघुनाथ कदम ( वय २३, रा. कोळीये, ता.खेड, जि.पुणे ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी महेंद्र अशोक ससाणे ( रा. कोळीये, ता.खेड, जि.पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीचे वडील रघुनाथ सयाजी कदम ( वय ५७ ) यांनी फिर्याद दिली आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी कि, सुमारे एक वर्षांपासून ते ३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी साडे अकरापर्यंत नयना हिस आरोपी महेंद्र याने वेळोवेळी समक्ष भेटून व मोबाईलवरून तिला कॉल व मेसेज करून तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुझे लग्न होऊन देणार नाही. मी सर्वांकडे तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. तसेच एकदा ठरलेले लग्न मोडून व आता ठरलेले लग्न मोडण्याची धमकी देऊन नयना हिचे जीवन नकोसे करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रम पासलकर हे अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्न