उल्हासनगरातील ग्रीन लिफ हॉटेलात एका टोळक्याकडून मुलींना मारहाण
By सदानंद नाईक | Updated: October 16, 2023 21:37 IST2023-10-16T21:37:31+5:302023-10-16T21:37:53+5:30
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४, लालचक्की परिसरातील ग्रीन लिफ हॉटेलात दोन मुलीची छेड काढून मारहाण केल्याची घटना उघड झाली. या ...

उल्हासनगरातील ग्रीन लिफ हॉटेलात एका टोळक्याकडून मुलींना मारहाण
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४, लालचक्की परिसरातील ग्रीन लिफ हॉटेलात दोन मुलीची छेड काढून मारहाण केल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी चौघावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केल्यावर त्यांची वैयक्तीक जामिनावर सुटका झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
उल्हासनगर लालचक्की चौक येथील ग्रीन लिफ हॉटेल मध्ये ११ ऑक्टोबर रोजी योगीता ही मुलगी आपल्या मावस बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाऊ व बहिणीच्या मुलासह गेली होती. हॉटेल मधील त्यांच्या टेबला समोरच्या टेबलवर तोंड ओळखीचा आकाश नावाचा मुलगा मित्रा सोबत बसला होता. यातील आकाश याने त्या दोघी बहिणीकडे अश्लिल हावभाव करुन तुझा मोबाईल नंबर दे असे बोलुन खुणावत होता. याबाबत मुलींनी हॉटेल व्यवस्थापकाला सांगून टेबल बदली करण्यास सांगितल्यावर, व्यवस्थापकाने मुलांना समज दिली. मात्र त्यानंतरही त्यांचे अश्लील हावभाव सुरू होते. तेव्हा योगीताच्या बहिणीने आक्षेप घेतल्यावर, आकाशने चिडुन जातीवाचक शिवीगाळ करीत दोघीही बहिणीला मारहाण केली. मारहाणीत बहिणीच्या डोक्याला मार लागुन कानाचा पडदा फाटला आहे.
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात योगीताने तक्रारीवरून पोलिसानी भांदवी कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार आकाशसह तीन गुंडांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ५ हजार वैयक्तिक टेबल जामिनावर सुटका केली. अटक होऊन मुलांची सुटका झाल्याने, मुलींनी त्यांच्यापासून जीवाला भीती असल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कोकरे करीत आहेत.