शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीकडून प्रियकराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, व्हॅलंटाईन वीकमध्ये घडली संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:53 IST

Crime News : लोहोणेरमधील घटना; प्रेम प्रकरणातून वाद, गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक जिल्ह्यात अगोदरच गुन्हेगारीने कळस गाठला असतानाच देवळा तालुक्यात एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. लोहोनेर येथील एका तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रेम प्रकरणातून वाद होऊन संबंधित प्रेयसीनेच प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.११) दुपारी  देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी युवतीसह कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील प्लंबिंग व्यवसाय करणारा युवक गोरख काशीनाथ बच्छाव याची तीन वर्षांपासून रावळगाव येथील एका युवतीशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने गोरखकडून लग्नाची मागणी होऊ लागली. मात्र, युवतीच्या कुटुंबीयांकडून त्यास विरोध होता. यातून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली. सदर वाद मिटावेत म्हणून समझोता करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी साडेअकराच्या वाजेच्या सुमारास युवतीचे कुटुंबीय लोहोणेर येथे दाखल झाले. मात्र, बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने वाद वाढत गेला. यावेळी युवतीच्या कुटुंबीयांकडून गोरख यास मारहाण करण्यात आली. सदर वाद काही ग्रामस्थांनी मिटविण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी गोरख यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आल्याने गोरख हा स्वतःच्या बचावासाठी येथील ओमसाई मोबाईल शॉपी या दुकानात घुसला. यावेळी युवतीने त्याच्या अंगावर माचीसची काडी फेकल्याने गोरख सोनवणे हा सुमारे ३५ टक्के भाजला असून त्यास तातडीने पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. बघ्यांनी मात्र घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

एकीकडे व्हॅलेंटाईन वीक सुरु असताना या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर येथील ही घटना आहे. लोहोणेर येथील दोघांचे प्रेम प्रकरण होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याच दरम्यान मुलीला स्थळे दाखविण्याचे काम चालू होते. मात्र, सदर मुलामुळे ही स्थळे मोडली जात असल्याचे मुलीच्या घरच्यांचे म्हणणे होते. लग्न मोडल्याने मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या घटनेत युवक गंभीर भाजला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. यानंतर संबंधित युवकाला देवळा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. युवक ३५ टक्के भाजला असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनि सांगितले आहे. या प्रकरणी देवलळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह

पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यातयाबाबत पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे ( वय २३ ), गोकुळ तोंगल सोनवणे (वय ५७ ), निर्मला गोकुळ सोनवणे (वय ५२), हेमंत गोकुळ सोनवणे (वय ३०), प्रसाद गोकुळ सोनवणे, सर्व रा. बी. सेक्शन, रावळगाव यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत निकम हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकNashikनाशिक