शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नासाठी मागे लागली होती प्रेयसी, प्रियकराने दिलं नदीत ढकलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:34 IST

आंध्र प्रदेश पोलीस तरूणीच्या शोधात सहारनपूरमध्ये पोहोचले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी घटनेचा खुलासा केला. 

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खाताखेडी येथे राहणारा तरूण विजयवाडा आंध्र प्रदेशातील तरूणीला लग्नाचं आमिष दाखवून सहारनपूरमध्ये घेऊन आला. तरूणीने लग्नाचा तगादा लावला तर तो तिला फिरण्यासाठी म्हणून यमुना नदीवर घेऊन गेला आणि तिला नदीत ढकलून दिलं. अशात आंध्र प्रदेश पोलीस तरूणीच्या शोधात सहारनपूरमध्ये पोहोचले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी घटनेचा खुलासा केला. 

आंध्र प्रदेश आणि मंडीच्या पोलिसांनी मिळून तरूणीचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन केलं. मात्र, मृतदेह काही सापडला नाही. पोलिसांनी आरोपीकडून तरूणीचं दहा तोळे सोनं ताब्यात घेतलं. खाताखेडी येथे राहणारा आसिफ हा विवाहित आहे. काही दिवसांपूर्वी त्याची ओळख विजयवाडा येथील २४ वर्षीय  तस्लीमा सोबत झाली होती. दोघांची मैत्री झाली आणि ते फोनवर बोलू लागले होते. (हे पण वाचा : Shocking! डॉक्टरने स्पर्म बदलून शेकडो महिलांना केलं प्रेग्नेन्ट, असा झाला खुलासा....)

काही दिवसांपूर्वी आसिफ एका मित्रासोबत तस्लीमाला दिल्लीत भेटला आणि तिला कारमध्ये बसवून सहारनपूरला आणलं. वेगवेगळ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन त्याने तिला ठेवलं. तरूणी तिच्यासोबत १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन आली होती. तिकचे तरूणीच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. कॉल डीटेल्सच्या आधारावर आंध्र प्रदेश पोलीस सोमवारी सकाळी सहारनपूरच्या कोतवाली मंडीला पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी आसिफ आणि त्याच्या मित्राला अटक केली. चौकशीत आसिफने तस्लीमाला नदीत धक्का दिल्याचं मान्य केलं. (हे पण वाचा : अंडरगारमेंट्समधून ड्रग्स घेऊन जात होती १९ वर्षीय डीलर, पोलिसांनी पकडलं तेव्हा झाले हैराण)

पोलीस चौकशी आरोपींनी सांगितलं की, तस्लीमा आसिफसोबत लग्नासाठी तगादा लावत होती. पण तो आधीच विवाहित होता. त्याने तस्लीमाला सांगितलं की, तो आधी त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार आणि मग तिच्यासोबत लग्न करणार. यानंतर आसिफने मित्रासोबत मिळून तस्लीमापासून पिच्छा सोडवण्यासाठी प्लॅन केला. आसिफ आणि तैय्यब तरूणीला फिरायला घेऊन गेले. तिथे त्यांनी तरूणीसोबत फोटो काढले. त्यानंतर तिघेही घरी परत आले. 

१८ जुलैला पुन्हा त्याच ठिकाणी ते फिरायला गेले. इथे आसिफने तिला यमुना नदीत ढकललं. अजूनही तरूणीचा मृतदेह सापडलेला नाही. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. तसेच तरूणीच्या मृतदेहाचाही शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी