शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडने WhatsAppवर केले ब्लॉक, नंतर प्रियकराने अमेरिकेत दिला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:15 IST

Suicide Case : या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पंजाब पोलिसांनी मुलीची चौकशी केली.

पंजाबमधील एका तरुणाने प्रेमप्रकरणातून अमेरिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. तो गुरुदासपूरच्या भैनी मिया खान गावचे रहिवासी होता. लग्नाबाबत बोलल्यानंतर प्रेयसीने (Girlfriend) त्याचा मोबाईल नंबर WhatsAppवर ब्लॉक केल्याचे सांगितले जात आहे. या त्रासाला कंटाळून प्रियकराने (Boyfriend) आत्महत्या केली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पंजाबपोलिसांनी (Punjab Police)  मुलीची चौकशी केली.नोकरीसाठी अमेरिकेला गेला होता प्रियकर गुरुदासपूरचा रहिवासी असलेला रेशम सिंग 2019 मध्ये नोकरीसाठी अमेरिकेला (America) गेला होता. तेथून तो सतत त्याच्या प्रेयसीशी फोनवर बोलत असे. दोघांमध्ये लग्नाची चर्चा जास्त व्हायची. परदेशातून प्रेयसीच्या मागणीवरून तो पैसेही पाठवत असे. मृत रेशम सिंहच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, रविवारी त्यांच्या मुलाने अमेरिकेतून प्रेयसीला फोन करून लवकरात लवकर भारतात येऊन लग्न करणार असल्याचं सांगितले. हे ऐकून मैत्रिणीने फोन कट केला आणि त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्याला WhatsAppवरही ब्लॉक केले. या त्रासाला कंटाळून त्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मुलीचे कुटुंबीयही पैसे मागायचे   याप्रकरणी एसएचओ मेजर सिंह यांनी सांगितले की, मृत मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, त्यांचा मुलगा १२वीत शिकत होता. यादरम्यान त्याची एका मुलीशी मैत्री झाली. 2019 मध्ये त्यांचा मुलगा रेशम सिंग अमेरिकेला गेला होता. यादरम्यान तरुणी आणि तिचे कुटुंबीय तिच्याकडे लग्नाच्या बहाण्याने पैसे मागत होते. रेशमने लग्नाबाबत बोलणी सुरु केली असता त्याचा फोन नंबर ब्लॉक होता. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि फसवणूक झाल्याचे त्याला वाटू लागले.याप्रकरणी गुरुदासपूर पोलिसांनी मुलगी, तिची आई आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृताचे नातेवाईक आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmericaअमेरिकाPunjabपंजाबjobनोकरीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप