प्रेयसीनं केलेल्या ऍसिड हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू; दुसरीकडे लग्न ठरल्यानं प्रेयसीचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:03 PM2021-03-26T22:03:41+5:302021-03-26T22:07:31+5:30

प्रियकराचं लग्न दुसऱ्या तरुणीसोबत ठरल्यानं प्रेयसीचा संताप; ऍसिड हल्ल्यात स्वत:देखील भाजली

girlfriend acid attack on her boyfriend in agra | प्रेयसीनं केलेल्या ऍसिड हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू; दुसरीकडे लग्न ठरल्यानं प्रेयसीचा संताप

प्रेयसीनं केलेल्या ऍसिड हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू; दुसरीकडे लग्न ठरल्यानं प्रेयसीचा संताप

Next

आग्रा: प्रेयसीनं केलेल्या ऍसिड हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाल्याची घटना आग्र्यात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर रात्री त्याच्या प्रेयसीकडे थांबला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यानंतर सकाळी ऍसिड हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला. तर प्रेयसीला इजा झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८ वर्षाच्या मुलीचं केलं अपहरण; लैंगिक शोषण करून हत्येनंतर विहिरीत फेकला मृतदेह 

गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कासगंजच्या सहावरचा रहिवासी असलेला तरुण देवेंद्र राजपूतवर त्याच्या प्रेयसीनं ऍसिड हल्ला केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दुपारी त्याचा मृत्यू झाला. देवेंद्र आग्र्यातल्या एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये नोकरीला होता. देवेंद्रनं आपल्यावर ऍसिड फेकल्याचा आरोप त्याची प्रेयसी सोनम पांडेनं केला. सोनम औरैयाच्या भागपूरची रहिवासी आहे. ती एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. शास्त्री नगरमधल्या एका घरात ती भाड्यानं राहते.

वीज कंपनीच्या अभियंत्यास आमदारांनी दोरीने बांधले; आमदार मंगेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

देवेंद्र रात्री सोनमच्या घरात थांबल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली. त्यांच्यात रात्री उशिरा भांडण झालं. त्यानंतर सकाळी ऍसिड हल्ल्याची घटना घडली. माझ्यावर ऍसिड टाकण्यात आलं, अशी माहिती सोनमनं पोलिसांना दिली. पण सर्वाधिक ऍसिड देवेंद्रच्या अंगावर आढळून आलं. त्यामुळे त्याला गंभीर इजा झाली. देवेंद्रचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरल्यानं सोनम नाराज होती, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली.

घरमालक सुरेश चंद यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोनम आधी शास्त्री नगरमध्येच असलेल्या एका दुसऱ्या घरात भाड्यानं राहायची. त्यामुळे ते तिला ओळखतात. ती पाच महिन्यांपासून चंद यांच्या घरात भाड्यानं वास्तव्यात आहे. चंद राहत असलेल्या घरात सोनम पहिल्या मजल्यावर राहते. देवेंद्र आपला पती असल्याचं तिनं चंद यांनी सांगितलं. देवेंद्र महिन्यातले १० दिवस सोनमसोबत राहायचा. 

Web Title: girlfriend acid attack on her boyfriend in agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.