पतीच्या शोधात असलेल्या महिलेला फकीर बाबाने घातला गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 09:01 PM2018-11-20T21:01:40+5:302018-11-20T21:03:19+5:30

पवई परिसरात नेहा (नावात बदल) पती आणि ६ वर्षांच्या मुलासोबत राहतात. १२ नोव्हेंबर रोजी पती घर सोडून निघून गेले. पती कुठे गेले? याचा शोध सुरू होता. १५ तारखेला सकाळी त्या शेजारच्या महिलेला पतीबाबत सांगत असताना, एक फकीर तेथे धडकला.

The girl who was looking for her husband got married to Baba | पतीच्या शोधात असलेल्या महिलेला फकीर बाबाने घातला गंडा 

पतीच्या शोधात असलेल्या महिलेला फकीर बाबाने घातला गंडा 

Next
ठळक मुद्दे १२ नोव्हेंबर रोजी पती घर सोडून निघून गेले. पती कुठे गेले? याचा शोध सुरू होता. शेजारच्या महिलेला पतीबाबत सांगत असताना, एक फकीर तेथे धडकला. त्याने नेहा यांना चिंतेचे कारण विचारले. त्याच्याकडे दिलेले नारळ फोडताच त्यातून लाल रंगाचे पाणी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे निघाल्याचे महिलेने पाहिले. तिचा बाबावरचा विश्वास वाढला.

मुंबई - बेपत्ता पतीचा शोध घेणाऱ्या महिलेचे दागिने एका फकीर बाबाने लुटल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. या प्रकरणी रविवारी पवई पोलिसांनी फकीर बाबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पवई परिसरात नेहा (नावात बदल) पती आणि ६ वर्षांच्या मुलासोबत राहतात. १२ नोव्हेंबर रोजी पती घर सोडून निघून गेले. पती कुठे गेले? याचा शोध सुरू होता. १५ तारखेला सकाळी त्या शेजारच्या महिलेला पतीबाबत सांगत असताना, एक फकीर तेथे धडकला. त्याने नेहा यांना चिंतेचे कारण विचारले.
तिने पती बेपत्ता झाल्याचे सांगताच, फकिराने त्यांच्या हातावर चुना लावला. त्यावर पाणी ओतताच पाणी गुलाबी झाले. पुढे त्याच्याकडे दिलेले नारळ फोडताच त्यातून लाल रंगाचे पाणी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे निघाल्याचे महिलेने पाहिले. तिचा बाबावरचा विश्वास वाढला. तेव्हा, फकिराने पती एका महिलेच्या नदी लागल्याचे सांगून उद्या येऊन उपाय सांगतो असे सांगितले. १६ तारखेला सकाळी बाबाने सांगितल्याप्रमाणे नेहाचे घर गाठले. बाबाने त्याच्याकडील चार खिळे दिले व घराच्या चार कोपऱ्यांमध्ये पेपरमध्ये ठेवण्यास सांगितले. तसेच पाटील सोन्याचे पाणी पाजल्यानंतर तो व्यवस्थित होईल आणि पुढे कधीच घर सोडून जाणार नाही असे सांगितले. त्यानुसार, महिलेने अंगावरील दागिने काढून बाबाकडे दिले. त्यात पीठ टाकून, मडके कपड्याने गुंडाळून सायंकाळी उघडण्यास सांगितले. त्याआधी उघडल्यास पती आणि मुलगा मरण पावतील अशी भीती घालून बाबा निघून गेला. सायंकाळी ५ नंतर तिने मडके उघडून बघितले असता त्यात दागिने नव्हते.  

सीसीटीव्ह फुटेजसह गाठले पोलीस ठाणे 
महिलेने परिसरात बाबाचा शोध सुरू केला. तेव्हा, १७ तारखेला एका कार्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये बाबा कैद झालेला दिसला. तिने हे फूटेज घेऊन १८ रविवारी पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तक्रारतक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फुटेजच्या आधारे फकीर बाबाचा पोलीस शोध घेत आहेत. 

Web Title: The girl who was looking for her husband got married to Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.