शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये भरधाव टेम्पोने बालिकेला चिरडले; संतप्त जमावाकडून दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 19:27 IST

बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

संदीप झिरवाळ -

नाशिक : आईसोबत किराणा दुकानात जाणाऱ्या एका आठ वर्षीय बालिकेला भरधाव टेम्पोने धडक दिली. या धडकेत जोया सलीम शेख (८,रा.अवधूतवाडी) या बालिकेचा मृत्यू झाला. घटनेनंतर जमलेल्या संतप्त जमावाने टेम्पोवर दगडफेक करत तोडफोड केली. यामुळे परिसरात तणावाची स्थिती पसरल्याने पंचवटी, म्हसरूळ पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिंडोरी रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ गजानन चौकातून सोमवारी (दि.१) सायंकाळी सहा वाजता जोया ही त्याची आई शबनमसोबत रस्ता ओलांडत होती. याचवेळी पंचवटीकडून म्हसरूळकडे भरधाव जाणारा टेम्पोने (एमएच१५-एचएच ४८५८) जोयाला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चिमुकली टेम्पोच्या चाकाखाली सापडून चिरडली गेली. तसेच त्याच ठिकाणाहून रस्ता ओलांडत असलेला मोहसिन मोहम्मद इस्लाम हा मुलगाही जखमी झाला. यावेळी पाटाजवळील वज्रेश्वरीनगर परिसरातील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले. अपघातग्रस्त टेम्पोला घेराव घालत दगडफेक करून टेम्पोची तोडफोड केली. परिसरातील संतप्त जमावामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबळी होती. अपघाताच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जमाव पांगवत टेम्पोचालक रुस्तम दत्तात्रय टेंगसे (रा.हिरावाडी) याला अटक केली. जोयाची आई फिर्यादी शबनम फिरोज खान (२०,रा.अवधूतवाडी) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालक संशयित रुस्तम टेंगसेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक निरीक्षक पडोळकर हे करीत आहेत.

टेम्पो पोलिस ठाण्यात -जमलेल्या जमावाने मालवाहू वाहनावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवत रस्ता वाहतुकीला मोकळा करून दिला. तसेच अपघातग्रस्त मालवाहू टेम्पो पोलिस ठाण्यात जमा केला आहे. यावेळी चालकाला काही नागरिकांनी रागाच्या भरात मारहाण करण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी