शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' मेलेल्या मुलाला जिवंत करा! ग्रामस्थांनी चेटकिण समजून दोघींना बेदम मारले; कपडे फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 14:37 IST

ग्रामस्थांकडून दोन मुलींना जबर मारहाण; गयावया करूनही सुटका नाही; मांत्रिकाच्या सल्ल्यामुळे घडला प्रकार

जमुई: आपण २१ व्या शतकात, विज्ञान युगात राहतो. मात्र आजही काही भागांमध्ये अंधश्रद्धा अतिशय खोलवर रुजल्या आहेत. लोकांच्या मनावर अंधश्रद्धेचा पगडा असल्यानं त्यांच्या हातून सर्रास गुन्हे घडतात. बिहारच्या जमुईमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चेटकिणी असल्याचं समजून दोन मुलींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना सिमुलतला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गादी टेलवा गावात वास्तव्यास असलेल्या राकेश साह नावाच्या व्यक्तीच्या पाच महिन्यांचा मुलाचा मृत्यू झाला. मुलाचं अचानक निधन झाल्यानं त्याचे कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन एका मांत्रिकाकडे गेले. या मुलाची हत्या चेटकिणीनं केल्याचं त्यानं मांत्रिकानं सांगितलं. मुलाचा मृतदेह गावाबाहेर असलेल्या नदीच्या पात्रात असलेल्या वाळूत पुरून ठेवा. मग ज्या चेटकिणीनं त्याचा जीव घेतला ती त्याला जेवण भरवण्यासाठी नक्की येईल, अशी सूचना मांत्रिकानं केली.जेवण देण्याच्या बहाण्यानं रुग्णवाहिकेतच महिलेवर गँगरेप; जयपूरमधील लाजिरवाणा प्रकारमांत्रिकेच्या सूचनेनुसार ग्रामस्थांनी लहान मुलाचा मृतदेह वाळून पुरला आणि काही अंतरावर दबा धरून बसले. रात्री १२ च्या सुमारास त्यांना तिथे दोन मुली दिसल्या. त्यांना ग्रामस्थांनी पकडलं आणि गावात आणलं. वाळूत पुरण्यात आलेल्या मुलालादेखील त्याच्या कुटुंबियांनी गावात आणलं आणि त्या दोन मुलींना त्याला जिवंत करण्यास सांगितलं. आम्ही शेजारच्या गावच्या रहिवासी आहोत. आम्हाला सोडा, अशी विनवणी दोघींनी केली. मात्र ग्रामस्थांनी त्यांचं ऐकलं नाही.मांत्रिकावर विश्वास असलेल्या ग्रामस्थांनी मुलींचे कपडे फाडले, त्यांचे केस कापले. त्यानंतर हातात मिळेल त्या वस्तूनं त्यांना जबर मारहाण केली. आम्हाला मुलाच्या मृत्यूबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही केवळ शौच करण्यासाठी नदी किनारी आलो होतो, असं सांगत मुलींनी ग्रामस्थांकडे दयेची भीक मागितली. मात्र तरीही ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच झाझा सर्कलचे निरीक्षक सुशील कुमार सिंह यांनी एक पथक गादी टेलवा गावात पाठवलं. मात्र ग्रामस्थांनी त्यांना पळवून लावलं. यानंतर एसएसबीच्या जवानांचं पथक गावात पाठवण्यात आलं. या पथकानं मुलींची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली.