शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 21:38 IST

उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणा-या ढोंगी बाबाचा पर्दाफाश झाला

गोंदिया  - उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणाºया ढोंगी बाबाचा पर्दाफाश गोंदियात झाला. सात दिवस उपचारासाठी बंद घरात डांबून ठेवलेल्या एका १७ वर्षाच्या मुलीवर त्या ढोंगी बाबाने सतत पाच दिवस अतयाचार केला. त्या ढोंग्याला आता तुरूंगाची हवा खावी लागली.गोंदिया शहरातील एका कुटुंबातील महिला मंडळी आरोग्याला घेऊन त्रस्त होती. त्यातच त्यांच्या घरातील एका १७ वर्षाच्या मुलीच्या छातीला गाठ आल्याने ती गाठ दुरूस्त करून देण्याचा दावा फुलचूर येथील लंकेश उर्फ वामनराव मेश्राम (३०) या ढोंगी बाबाने केला. त्यामुळे त्याला उपचारासाठी २७ मार्चला बोलाविण्यात आले. त्याने उपचाराच्या नावावर घरातील सर्व मंडळींना काळ्या रंगाची एक गोळी खायला दिली.त्या गोळीमुळे सर्वांना गुंगी यायची. त्या सर्व गुंगीत असताना आरोपी १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचा. २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपचाराच्या नावावर त्याने त्या पिडीत मुलीलाच नव्हे तर घरात उपस्थित सर्व मंडळींना काळ्या रंगाची गुंगी आणणारी औषधी देण्याचे काम त्याने केले. त्यानंतर गुंगीत भिंगत असलेल्या त्या पिडीतेच्या नातेवाईकांसमोरच त्याने सतत पाच दिवस तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तिची मावशीही त्या पिडीतेच्या घरी असल्याने तिलाही गुंगीचे औषध दिले होते. त्यामुळे तिची मावशी सुध्दा त्याच खोलीत बसून होती. तिच्या डोळ्यासमोर पिडीतेवर अत्याचार केला. परंतु त्याचा विरोध कुणीच करू शकले नाही. त्या घरात सात दिवस सात माणसांना ढोगीं बाबाने गुंगीचे औषध दिले. सातपैकी ८-८ वर्षाची दोन मुले व पाच महिला-मुली होत्या. ३१ मार्चला त्याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही. १ ते ४ एप्रिल दरम्यान दररोज चार दिवस त्याने तिच्यावर बळजबरी केली. असे आले प्रकरण उघडकीसपिडीतेचे वडील व काका कामानिमीत्त बाहेरगावी गेले होते. काका बाहेगावावरून आल्यानंतर आपल्या पत्नीला बोलाविण्यासाठी पिडीतेच्या घरी गेले. परंतु त्या घराला बाहेरून कुलूप लावले होते. ते कुठे गेले यासंदर्भात शेजाºयांना विचारणा केली असता आठवडाभरापासून कुलूप बंदच असल्याचे सांगण्यात आले. परंतु लोक आत आहेत असेही सांगण्यात आले. त्यांनी त्यावर त्या घराचे कुलूप तोडले. त्यावेळी सर्व लोक गुंगीत घरातील कानाकोपºयात झिंगून पडले होते. आरोपी देखील एका कोपºयात पडून होता. लोक गोळा झाले आणि हे प्रकरण उघडकीस आले.नागरिकांनी दिला चोपबंद घरात सात लोकांना गुंगीचे औषध देऊन एका १७ वर्षाच्या मुलीवर चार दिवस सतत अत्याचार करणाºया नराधमाला त्या पिडीतेच्या घराजवळील लोकांनी चांगलाच चोप दिला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या त्या नराधमाला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यायात दाखल करावे लागले. भंडाराच्या तुंरुगात रवानगीपिडीतेवर अत्याचर केल्याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसात ५ एप्रिलला तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३७६ (२) (जे) (एन), ३४२, ५०६ सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु लोकांनी त्याला चांगलाच चोप दिल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ९ एप्रिल रोजी त्याला पोलीस उपनिरीक्षक संदीया सोमनकर यांनी अटक केली. न्यायालयाने ९ ते १५ एप्रिल दरम्यान पोलीस कोठडी सुनावली. आता त्याला भंडाराच्या कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र