प्रियकराच्या मदतीने मुलीने केली आईची हत्या, अहेरीत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2022 10:29 IST2022-08-19T10:26:10+5:302022-08-19T10:29:54+5:30
मृत निर्मला आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणलेले आहे.

प्रियकराच्या मदतीने मुलीने केली आईची हत्या, अहेरीत खळबळ
अहेरी (गडचिरोली) : येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळच्या परिसरात राहणाऱ्या निर्मला आत्राम यांची त्यांच्या घरात गळा आवळून हत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
निर्मला यांची मुलगी उर्मिला चंद्रकांत आत्राम हिने आपला प्रियकर रुपेश येनगंधलवार याच्यासोबत मिळून ही हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मृत निर्मला आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणलेले आहे. पुढील कारवाई अहेरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने अहेरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी उर्मिला हीचे वडील चंद्रकांत आत्राम हे पोलीस दलात कार्यरत होते. २० वर्षांपूर्वी त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून उर्मिला हिचे पालनपोषण आईनेच केले होते. वडीलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तिलाही पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती. पण जन्मदात्या आईची हत्या करण्याच्या कुबुद्धीने तिच्यावर गजाआड व्हावे लागण्याची वेळ आली.