शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेपपासून वाचण्यासाठी मुलीने शाळेच्या छतावरून मारली उडी; ५ जणांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 21:55 IST

Gangrape Case : मुलीने नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी शाळेच्या इमारतीच्या छतावरून उडी मारल्याने ती जखमी झाली.

भुवनेश्वर : जाजपूर जिल्ह्यातील कलिंगनगर पोलीस ठाण्यांतर्गत झुमापाडा गावात रविवारी रात्री एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर (१५) शाळेत सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

मुलीने नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी शाळेच्या इमारतीच्या छतावरून उडी मारल्याने ती जखमी झाली. कलिंगनगर येथील रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी सांगितले की, केंझार जिल्ह्यातील आनंदपूर येथील तिच्या भावासह ही मुलगी रविवारी संध्याकाळी कलिंगनगर पोलिस ठाण्यांतर्गत डुबुरी चक येथे कालीपानी येथील नातेवाइकांच्या गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. घटनास्थळाजवळ उपस्थित असलेल्या पाच जणांनी त्यांना बसेसच्या अनुपलब्धतेबद्दल सांगितले आणि डुबुरीजवळील झुमापाडा येथील शाळेत रात्र राहण्याचा सल्ला दिला.

त्यांना शाळेत आश्रय देण्याच्या बहाण्याने त्यांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीने बलात्काराच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी शाळेच्या छतावरून उडी मारली. त्यांनी तिच्या लहान भावालाही मारहाण केली. पीडितेच्या भावाने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. "आम्ही तात्काळ कारवाई केली आणि पाचही आरोपींना पकडले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत," असे कलिंगनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक प्रियब्रत राउत यांनी सांगितले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसOdishaओदिशाSchoolशाळा