शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारातून गरोदर राहिलेल्या अल्पवयीन पीडितेने दिला मुलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 16:01 IST

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली....

ठळक मुद्देदेहूरोड येथील घटना : १९ वर्षीय तरुण जेरबंद

पिंपरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली. यातून पीडितेने मुलीला जन्म दिला. देहूरोड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी तरुणास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन उर्फ हानी पासवान (वय १९, रा. आदर्शनगर, देहूरोड, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलीची आई घरकाम करते. २०१८ मध्ये असेच एका ठिकाणी घरकामासाठी आई गेली असता पीडित मुलगीही तेथे गेली होती. तिची आई घरात काम करीत होती. पीडीत मुलगी बाहेर होती. त्यावेळी आरोपी सचिन पासवान व पीडित मुलीची भेट झाली. तीन महिन्यांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अल्पवयीन पीडित मुलगी व तिची मैत्रीण आरोपी सचिन पासवान याला भेटले. त्यानंतर पीडित मुलीची मैत्रीण तेथून निघून गेली. आरोपी सचिन याने पीडित मुलीला तेथे काम सुरू असलेल्या एका इमारतीत घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने कोणास काहीही सांगितले नाही. त्यानंतर आरोपी सचिन याने एक महिन्यानंतर पीडित मुलीवर दोन-तीन वेळा अत्याचार केला. वडील तापट स्वभावाचे असल्याने पीडित मुलीने याबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. अत्याचारातून पीडित मुलगी गरोदर झाली. पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात घेऊन गेली. तेथील महिला डॉक्टर पीडित मुलगी व तिच्या आईला देहूरोड पोलीस ठाण्यात घेऊन गेली. त्यानंतर छावणी रुग्णालयात व तेथून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अल्पवयीन पीडितेने मुलीला जन्म दिला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ११) रात्री पावणेअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :dehuदेहूRapeबलात्कारpregnant womanगर्भवती महिलाPoliceपोलिस