शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरुतून लग्नासाठी गोव्यात आली, जंगलात सापडला मृतदेह; बसच्या तिकीटावरुन सापडला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:46 IST

गोव्यात बंगळुरुतील एका तरुणीचा निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Goa Crime: गोव्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. बंगळुरुतून गोव्यात लग्नासाठी आलेल्या एका तरुणीची गळा चिरलेला मृतदेह जंगलात सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा २४ तासांच छडा लावत आरोपी प्रियकराला अटक केली. दोघांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादानंतर प्रियकराने हे धक्कादायक कृत्य केलं. त्यानंतर प्रियकराने तरुणीचा गळा चिरून खून केला. यानंतर तरुणीचा मृतदेह प्रताप नगरच्या जंगलात फेकून दिला आणि नंतर बंगळुरूला पळ काढला.

पोलिसांनी बंगळुरू येथील रहिवासी संजय केविन एम याला तरुणीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी मोशे एम असं या तरुणीचे नाव आहे. ती उत्तर बंगळुरूची रहिवासी होती. दोघेही नुकतेच लग्न करण्याच्या उद्देशाने बंगळुरूहून गोव्यात आले होते. मात्र दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. त्यानंतर संजयने रोशनीचा गळा चिरून खून केला आणि मृतदेह जंगलात फेकून देऊन बंगळुरूला पळ काढला.

पावसामुळे तिथले पुरावे नष्ट झाले होते. त्यामुळे मृताची ओळख पटणे कठीण झाले होते. पोलिसांना तिथे एका पर्समध्ये कर्नाटक बस तिकीट मिळाले. त्या तिकिटाच्या आधारेच पोलिसांनी तपास सुरू केला आणि तरुणीची ओळख पटवली. पोलिसांना हत्येच्या ठिकाणी हुबळी ते गोव्याच्या तिकिटाचा तुकडा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी बस स्टँडवर सीसीटीव्हीची तपासणी केली तेव्हा रोशनी आणि संजय दिसून आले.

रोशनीची हत्या केल्यानंतर संजय हुबळीला पळून गेला होता. गोवा पोलिसांनी कर्नाटक पोलिसांना संजयविषयी माहिती दिली. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. संजय आणि रोशिनी या दोघांनी काही दिवसांपूर्वी गोव्याला येण्याचा बेत केला होता. त्यानुसार ते गोव्यात फिरत होते. परतीच्या प्रवासात दोघांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे संजयने रागाच्या भरात प्रतापनगर-धारबांदोडा येथील गर्द झाडीत नेऊन रोशिनी हिचा गळा चिरला. 

संजय यांची रोशिनी यांचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच रोशिनी हिला नोकरी लागली होती. तर संजय बेरोजगार आहे. दोघांनीही गोव्याला येण्याचे ठरवले, त्यानुसार ते आले. रोशिनीला नोकरी लागल्यापासून संजयला तिच्यावर संशय होता. आपल्याला नोकरी नसल्यामुळे रोशिनी आपल्याला सोडून जाईल, अशी भीती त्याच्या मनात होती. गोव्यात आल्यानंतर यावरुन त्या दोघांत वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'ती माझी नाही तर कोणाचीच नाही', भावनेतूनच तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस