शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बळजबरीने बालविवाह लावून दिल्याने मुलीनेच माहेर व सासरच्यांविरोधात नोंदवला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:51 IST

मुलगी अल्पवयीन असताना तिचा बळजबरी बाल विवाह लावून देणाऱ्या माहेर व सासरची मंडळी, भटजी आणि लग्नातील वऱ्हाडिं वर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मुलगी अल्पवयीन असताना तिची शिकण्याची इच्छा दडपून टाकत तिचा बळजबरी बाल विवाह लावून देणाऱ्या आई वाडीलांसह माहेर व सासरची मंडळी, भटजी आणि लग्नातील वऱ्हाडिं वर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 काशीमीरा भागात राहणारी पीडिता ही गेल्या वर्षी १७ वर्षांची होती व ११ वीत शिकत होती. परंतु गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागले आणि मे २०२० मध्ये तिचे आई, वडील , भाऊ हे तिला उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या कोराळ ह्या मूळगावी घेऊन गेले. तेथे त्यांनी तिचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या हुंडेगाव येथील तरुणाशी निश्चित केले.

आपल्याला शिकायचे आहे , अजून मी लहान आहे असे सांगून देखील घरच्यांनी २९ जून २०२० रोजी तिचे लग्न बळजबरी त्या तरुणाच्या मूळ गावी लावून दिले. लग्ना नंतर सासरी पती, सासू - सासरे हे तिला घरात कोंडून ठेवायचे, शिवीगाळ करत त्रास द्यायचे म्हणून ती तिच्या आजी आजोबांकडे गेली. 

जानेवारी २०२१ मध्ये ती आई - वडील सह काशीमीरा येथे घरी परत आली. घरचे तिच्यामागे सासरी जाण्यास तगादा लावत होते. जेणेकरून मुलीने चाईल्ड लाईन संस्थेशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्या संस्थेने ३१ ऑगस्ट रोजी काशीमीरा पोलिसात तक्रार अर्ज दिला. मुलीला संस्थेच्या माध्यमातून बोरिवली च्या एका निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी पीडितेच्या फिर्यादी नुसार बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीं मध्ये मुलीचे आई - वडील , पती, सासू - सासरे, मामा, लग्न लावून देणारे भटजी व लग्नास उपस्थित वऱ्हाडी आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर