शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा लिटर सॅनिटाईजर प्राशन करत मनगटाची नस कापून युवतीने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:30 IST

Suicide Case : बिटको रुग्णालयाच्या आवारात घडली घटना

ठळक मुद्देशिवानी लक्ष्मण भुजबळ (२०, रा. आशेवाडी, ता. दिंडोरी) असे आत्महत्या करणार्‍या युवतीचे नाव आहे. सकाळी तीने रूग्णालयाच्या आवारात अर्ध्या लिटरची सॅनिटाईजरची बाटली रीती करत सॅनिटाईजरचे सेवन केले.. तसेच धारदार शस्त्राने दोन्ही मनगटावर वार करून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

नाशिक : बिटको रूग्णालयाच्या आवरात आपल्या आईला भेटायला आलेल्या एका वीस वर्षीय युवतीने सॅनिटाईजर प्राशन केले आणि दोन्ही हातांच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. जखमी युवतीचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.3) खासगी रुग्णालयात मृत्यु झाला. शिवानी लक्ष्मण भुजबळ (२०, रा. आशेवाडी, ता. दिंडोरी) असे आत्महत्या करणार्‍या युवतीचे नाव आहे. रविवारी शिवानी ही बिटको रूग्णालयात आली होती.

सकाळी तीने रूग्णालयाच्या आवारात अर्ध्या लिटरची सॅनिटाईजरची बाटली रीती करत सॅनिटाईजरचे सेवन केले.. तसेच धारदार शस्त्राने दोन्ही मनगटावर वार करून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे ती गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी शिवानी हिला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर तिच्या नातेवाईकांनी प्रकृती खालावल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी तीला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या अचानकपणे झालेल्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ही बातमी गावामध्ये समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावामध्ये गेल्या १० दिवसांत कोरोनाने घेतलेला हा सहावा बळी असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. गावामध्ये ग्रामसेवक नसून अतिरिक्त नाशिकरोड येथील बिटको कोविड सेंटरला भरती केले कार्यभार शेजारील गावचे ग्रामसेवक यांच्याकडे होते.शनिवार, दिनांक १ मे रोजी पहाटे जया लक्ष्मण भुजबळ (५०) यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे नाशिकला हलविले. तेथे ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू आलेला आहे. त्यामुळे गावाकडे लक्ष दिले जात नाही. झाला. ही बातमी त्यांच्या बाधित असलेल्या मुलीला  समजल्यानंतर तिला प्रचंड धक्का बसला या नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तरी कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नियुक्ती गावात करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू