सहाव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:58 IST2018-10-24T15:52:56+5:302018-10-24T15:58:02+5:30
याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

सहाव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या
मुंबई - राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून रानू इजरार अहमद बेग (वय २०) नावाच्या तरुणीने आत्महत्या केली. मालाडमध्ये आज सकाळी हा प्रकार घडला असून या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या तरुणीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याची सखोल चौकशी करत आहेत.