शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 15:52 IST

Crime News : मुलीला माहेरी घेऊन आले. त्यानंतर वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणीला तिचे वडील आणि भावाने मिळून झाडाला उलटं लटकलं आणि नंतर बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

अलीराजपूरचे एसपी विजय भागवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 50 किलोमीटर दूर बोरी ठाण्याजवळील एका गावात 28 जून 2021 रोजी ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणीचा विवाह हा शेजारच्या गावात राहणाऱ्या एका तरुणाशी झाला होता. तिचा पती तिला एकटीला सोडून मजुरीचं काम करण्यासाठी गुजरातला गेला. त्यामुळे नाराज झालेली तरुणी कोणालाही याबाबत काहीही न सांगता आपल्या मामाच्या घरी म्हणजेच आंबी गावात गेली होती.

तरुणी मामाच्या गावी गेल्यामुळे तिच्या माहेरची मंडळी नाराज झाली. ते मुलीला माहेरी घेऊन आले. त्यानंतर वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर आपटून देखील तिला मारहाण करण्यात आली. ती बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करण्यात येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका स्थानिक व्यक्तीने हा व्हिडीओ काढला असून तो आता जोरदार व्हायरल होत आहे. यामुळेच हा भयंकर प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून ते अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू; पतीने दोन्ही मुलींची गळा घोटून हत्या करून केली आत्महत्या 

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पतीने आपल्या दोन मुलींची गळा घोटून हत्या केली आणि नंतर टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलींना मारल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक