शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 21:18 IST

Gelatin found outside Mukesh Ambani's house : याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात भादंवि कलम २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० (ब) आणि एक्सप्लोसिव्ह सबस्टेन्स ऍक्ट १९०८ कलम ४अन्वये गुन्हा दाखल आहे. 

ठळक मुद्दे याप्रकरणी मुंबई पोलीस जलद गतीने तपासकार्य करताना दिसत आहेत. जर जिलेटीनच्या बॉक्सवर बारकोड असेल तर कुठल्या ठिकाणी आणि कोणाला ते जिलेटीन विकले हे समजण्याची शक्यता आहे. 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील अँटिनिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या २० काड्या, धमकीचे पत्र आणि ४ गाडीच्या नंबर प्लेट असलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली. गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या काड्या एका नागपूरच्या कंपनीच्या असल्याने या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन समोर आलं आहे. त्यानुसार मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने संबंधित मालकाची चौकशी केली. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात भादंवि कलम २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० (ब) आणि एक्सप्लोसिव्ह सबस्टेन्स ऍक्ट १९०८ कलम ४अन्वये गुन्हा दाखल आहे. 

जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती कड्यांवर असलेल्या कव्हरवरून मिळाली आहे. सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही जिलेटिनसारखी स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात. सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी यासंबंधी मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचे सांगितले. आम्ही आतापर्यंत ज्या ज्या लोकांना जिलेटीन दिलंय, त्यांची माहिती आम्ही पोलिसांनी दिली आहे, असं कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं. सोलर इंडस्ट्रीजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक ए के श्रीवास्तव यांनी सांगितले, पोलिसांनी आम्हाला प्रोडक्शन कसे केले जाते आणि ते उत्पादन कसे विकले जाती याबाबत विचारली आणि आम्ही त्यांना माहिती दिली आहे. जर आम्हाला जिलेटीन काड्यांच्या बॉक्सवरील बारकोड मिळाला तर त्या बद्दल सविस्तर माहिती आम्ही देऊ शकतो.  

 

गुरूवारी मध्यरात्री १.३० वाजता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्हमध्ये तयार झाल्या आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली’, असे सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलीस जलद गतीने तपासकार्य करताना दिसत आहेत. जर जिलेटीनच्या बॉक्सवर बारकोड असेल तर कुठल्या ठिकाणी आणि कोणाला ते जिलेटीन विकले हे समजण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMumbaiमुंबईPoliceपोलिसnagpurनागपूर