Geeta jain's supporter missing; Complaint lodged at Navghar police station | गीता जैन यांचे समर्थक बेपत्ता; नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 
गीता जैन यांचे समर्थक बेपत्ता; नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

ठळक मुद्देया प्रकरणी त्यांचा मुलगा अंकुश याने नवघर पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार दिली आहे. शर्मा कुटुंबीय या घटनेने चिंतेत असून नवघर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. 

मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा संघातील अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे कट्टर समर्थक देवेंद्र शर्मा ( 50 ) रा . सोनमचंद्र , गोल्डन नेस्ट, भाईंदर  हे शनिवारी रात्रीपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

देवेंद्र पदयात्री म्हणून सर्वांना परिचित असून शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घरातून गीता जैन यांच्या कार्यालयात सांगून निघाले. परंतु रात्री ते परत आले नाही. सकाळी पण त्यांचे कुटूंबीय व गीता यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा मोबाईल देखील बंद येत आहे. 

भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांचा भाऊ विनोद यांनी अपक्ष उमेदवाराची पत्रके वाटणाऱ्या मुलांना मारहाण करून गाडीत टाकून नेले त्या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात जमलेल्या लोकांसह देवेंद्र दिसले होते. या प्रकरणी त्यांचा मुलगा अंकुश याने नवघर पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार दिली आहे. शर्मा कुटुंबीय या घटनेने चिंतेत असून नवघर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पदयात्री हे सामाजिक कार्यकर्ते असून आण्णा हजारे यांच्या आंदोलनात देखील त्यांनी भाग घेतला होता असे निकटवर्तीयांनी सांगितले.

Web Title: Geeta jain's supporter missing; Complaint lodged at Navghar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.