शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'मी Gay आहे, मला घटस्फोट दे...', लग्नानंतर पतीने केला धक्कादायक खुलासा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 15:30 IST

जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा तरूणीने आपल्या कुटुंबियांकडे याबाबत तक्रार केली तेव्हा प्रकरण मारहाणीवर आलं.

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधून एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. इथे कुटुंबियांनी तरूण समलैंगिक असल्याचं लपवून ठेवलं आणि हुंड्याच्या लालसेपोटी एका तरूणीसोबत लग्न लावून दिलं. जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा तरूणीने आपल्या कुटुंबियांकडे याबाबत तक्रार केली तेव्हा प्रकरण मारहाणीवर आलं. यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली.

नवविवाहित तरूणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, 29 मे 2021 रोजी तिचं लग्न सुरेंद्र कुमार जयस्वालचा मुलगा मनीष कुमारसोबत झालं होतं. तरूणीच्या वडिलाने हुंडा दिला आणि इतर खर्च पकडून 34 लाख रूपये खर्च केले.पण जेव्हा नवरी आपल्या सासरी पोहोचली तेव्हा तिच्या सासरच्या लोकांचं वागणं चांगलं नव्हतं. पीडितेचा आरोप आहे की, पतीने तिला वैवाहिक शारीरिक सूख दिलं नाही. याची माहिती तिने माहेरी येऊन कुटुंबियांना दिली. यावर आई-वडील म्हणाले की, सगळंकाही ठीक होईल.

सासरहून माहेरी आलेल्या मुलीला कुटुंबियांनी दिलासा दिला की, सगळ्या समस्या दूर होतील चिंता करू नको. त्यानंतर ते तिला तिच्या सासरी घेऊन गेले. आरोप आहे की, यावेळी रस्त्यात सासू ज्ञानवती, सासरा सुरेंद्र आणि तिच्या पतीचा मोठा भाऊ मुकेश त्यांना शिवीगाळ करून तरूणीला मारहाण करू लागले. 

पती काय म्हणाला?

सासरी पोहोचलेल्या तरूणीने पती मनीषसोबत झालेल्या रस्त्यातील घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. ज्यानंतर मनीष रडत तरूणीला म्हणाला की, 'मी तुझ्यासोबत दगा केलाय, मला घटस्फोट दे. मी परिवार आणि मामा अमृतलालच्या दबावात येऊन तुझ्यासोबत लग्न केलं. मी एक समलैंगिक आहे'. हे ऐकल्यानंतर महिलेला धक्का बसला.

इथेही वाद झाला आणि त्यानंतर तरूणी आपल्या भावासोबत माहेरी परत आली. तेच पोलिसांनी महिलेच्या सांगण्यावरून तिचा पती, सासू, सासरा, पतीचा मोठा भाऊ आणि त्याचा मामा यांच्याविरोधात हुंड्यासाठी त्रास आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. यावर पोलीस चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी