शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; फसवणूकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 20:36 IST

२००१ साली फ्लॅट बुकींग केल्यानंतर अद्याप फ्लॅट मिळालेले नाहीत.

ठळक मुद्देगाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करण्यात आले होते.खरेदीदारांचा आरोप आहे की, गंभीरने प्रोजेक्टमध्ये गुंतवणूकीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यात कंपनीला मदत केली होती.

नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आता स्थानिक कोर्टात त्याच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध याआधी देखील साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जवळपास ५० फ्लॅटच्या खरेदीदारांनी हा आरोप केला आहे की, २००१ साली फ्लॅट बुकींग केल्यानंतर अद्याप फ्लॅट मिळालेले नाहीत.गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करण्यात आले होते. मात्र, अद्याप फ्लॅट मिळाले नसल्याचा आरोप खरेदीदारांनी केला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर रूद्र बिल्डवेल रिअ‍ॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि एचआर इन्फ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या या प्रोजेक्टचा डायरेक्टर आणि ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध २०१६ मध्ये हाउसिंग प्रोजेक्ट बुकिंग करण्याच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, कंपनीने ६ जून २०१३ रोजी फ्लॅट देण्याचा दावा केला होता. मात्र, २०१४ पर्यंत फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. १५ एप्रिल २०१५ मध्ये अधिकाऱ्यांनी काही त्रुटींमुळे प्रोजेक्टची मान्यता रद्द केली. गंभीरशिवाय या प्रकरणात मुकेश खुराना, गौतम मेहरा आणि बबीता खुराना यांचीही नावे आहेत. खरेदीदारांचा आरोप आहे की, गंभीरने प्रोजेक्टमध्ये गुंतवणूकीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यात कंपनीला मदत केली होती. यांच्याविरुद्ध भा.दं. वि. कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयfraudधोकेबाजीGautam Gambhirगौतम गंभीरdelhiदिल्लीPoliceपोलिस