गुंडाचा पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस; व्हिडीओ व्हायरलमुळे पोलिसांची उडाली झोप

By सदानंद नाईक | Updated: August 21, 2022 17:10 IST2022-08-21T17:10:01+5:302022-08-21T17:10:22+5:30

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा रोशन झा यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Gangster's birthday in a police van; The police lost sleep because of the viral video | गुंडाचा पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस; व्हिडीओ व्हायरलमुळे पोलिसांची उडाली झोप

गुंडाचा पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस; व्हिडीओ व्हायरलमुळे पोलिसांची उडाली झोप

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील नामचीन गुंड रोशन झा यांचे समर्थकांनी चक्क पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस साजरा करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने, पोलिसांची झोप उडाली आहे. विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शनिवारी दुपारी कल्याण न्यायालयात एका गुन्ह्या संबंधात गुंड रोशन झा याला आणल्यावर सदर प्रकार घडली असून पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.

 उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा रोशन झा यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात असलेला रोशन झा या गुंडाचा त्याच्या समर्थकांनी पोलिसांच्या व्हॅनमध्ये वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गुंडाच्या समर्थकांनी चक्क पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस साजरा करून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने, एकच खळबळ उडवून पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकून पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शनिवारी दुपारी कल्याण न्यायालयात जेल मधून रोशन झा या गुंडाला एका गुन्ह्यात पोलीस व्हॅन मध्ये आणले होते. अशी माहिती उल्हासनगर पोलिसांनी दिली. मात्र पोलीस व्हॅन व पोलीस हे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. जेलचे पोलीस अथवा इतर पोलीस ठाण्याचे पोलीस व्हॅनवर असावे. असे पोलीस अधिकारी कदम म्हणाले. 

रोशन झा हा उल्हासनगरमधील गुंड आहे. त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकवणे आणि इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी या गुंडाला कारागृहातून कल्याणच्या न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेल्या गुंड रोशन झा यांने खिडकीमधून समर्थकांनी आणलेला केक कापला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. पोलिसांच्या व्हॅनमध्ये हा गुंड त्याचा वाढदिवस कसा काय साजरा करू शकतो?. असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाकडे पोलीस दुर्लक्ष करते की कारवाई करते. याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे.

Web Title: Gangster's birthday in a police van; The police lost sleep because of the viral video