शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर विकास दुबेचा पोलिसांकडून ठरवून एन्काऊंटर? सगळेच संशयास्पद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 04:27 IST

विकास दुबेने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला. हा एन्काउंटर ठरवून केला गेला की काय असा संशय आता व्यक्त होत आहे.

लखनऊ: आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. विकास दुबेला गुरुवारी मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. शुक्रवारी त्याला कानपूरला नेले जात असताना सकाळी ६.३0 च्या सुमारास पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला. हा एन्काउंटर ठरवून केला गेला की काय असा संशय आता व्यक्त होत आहे. तेलंगणमध्ये यापूर्वी झालेल्या बलात्कार प्रकरणातील संशयितांच्या एन्काउंटरशी याचे बरेच साधर्म्य आहे.उत्तर प्रदेश एसटीएफच्या गाडीतून विकासला कानपूरला नेले जात होते. त्यावेळी बर्राजवळ गाडीला अपघात झाला. गाडी उलटल्याने विकास दुबे आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र यानंतरही विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने एका एसटीएफ अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले. मात्र विकासने पोलिसांना जुमानले नाही. यानंतर विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली. त्यात विकास दुबे मारला गेला.विकास दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चकमक सुरू झाली. त्यामध्ये विकास दुबे गंभीर झाला. त्यानंतर त्याला कानपूरच्या हॅलट रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विकासचा शोध घेत होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली.एका सुरक्षा रक्षकाने विकास दुबेला ओळखल्यामुळे तो पकडला गेला. विशेष म्हणजे त्याआधी विकास दुबे त्या परिसरात फोटो काढत होता. पोलिसांनी अटक केल्यावरही विकासच्या चेहºयावर जराही पश्चाताप दिसत नव्हता. विकास दुबेची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस त्याला गाडीत बसवत असताना तिथे काही लोक गोळा झाले होते. त्यांना पाहून तो ‘होय, मीच विकास दुबे, कानपूरवाला’ असे ओरडला.विकास दुबेला अटक झाल्याची माहिती मिळताच या बातमीचा मागोवा घेणारे पत्रकार पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत होते. मात्र मध्येच या गाड्या अडवण्यात आल्या. एक पत्रकाराने सांगितले की, आम्ही पोलीस गाडीच्या अगदी नजीक होतो.अचानक पोलिसांनी आमच्या गाड्या अडविल्या आणि आमच्याकडे ओळखपत्रे मागायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. तथापि, पोलिसांनी मात्र असे काही झाले नाही, असे स्पषट केले.विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होता, असे असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या नव्हत्या. तो मोकळ्या हाताने दोन पोलिसांच्या मध्ये बसला होता. पोलिस गाडीच्या मागे असणाºया एका पत्रकाराने याला दुजोरा दिला आहे.

८ दिवसांत ५ एन्काऊंटरकानपूरमध्ये ८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर ८ दिवसात ५ एन्काऊंटर झाले आणि विकास दुबेसह त्याच्या गँगचे ५ सदस्य मारल्या गेले. त्यातील ४ एन्काऊंटरमध्ये जवळजवळ एकसारखेपणा होता. सर्व गुन्हेगार पोलिसांवर हल्ला करीत पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते.२ जुलै : विकास दुबेला पकडण्यासाठी ३ ठाण्यातील पोलीस बिकरू गावात दबा धरुन बसले. विकास गँगने ८ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती.३ जुलै : पोलिसांनी सकाळी ७ वाजता विकासचे मामा प्रेमप्रकाश पांडे व सहकारी अतुल दुबे यांचे एन्काऊंटर केले. २० -२२ कुख्यातसह ६० लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले.५ जुलै : पोलिसांनी विकासचा नौकर व विशेष सहकारी दयाशंकर ऊर्फ कल्लू अग्निहोत्री याला घेरले. पोलिसांच्या गोळीने दयाशंकर जखमी झाला. विकासने योजना आखून पोलिसांवर हल्ला केला होता, असे त्यानेसांगितले.६ जुलै : पोलिसांनी अमर दुबेची आई क्षमा दुबे व दयाशंकरची पत्नी रेखा यांच्यासह तिघांना अटक केली.८ जुलै : एसटीएफने विकासच्या जवळच्या अमर दुबेला मारले. प्रभात मिश्रासह १० गुन्हेगारांना अटक केली.९ जुलै : विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक. प्रभात मिश्रा व बरुआ दुबे एन्काऊंटरमध्ये मारले गेले.१० जुलै : विकास दुबे एनकाऊंटरमध्ये मारल्या गेला.भावाच्या आत्म्याला शांती मिळेल शहीद पोलिसाच्या बहिणीची प्रतिक्रियाकानपूर : विकास दुबे हा एन्काऊंटरमध्ये मारला गेल्याचे समजताच कानपूरमध्ये चकमकीत शहीद झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांच्या चेहºयावर समाधानाचे भाव दिसले. शहीद पोलीस राहुल यांची बहीण नंदिनी यांनी म्हटले आहे की, आज आमच्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल. विकासच्या फरार साथीदारांनाही पकडण्यात यावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.झांसीच्या भोजला गावातील शहीद सुल्तान सिंह वर्मा यांच्या पत्नी उर्मिला म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता, तो पाळला आहे. या चकमकीत जखमी झालेले अजय कश्यप यांनी म्हटले आहे की, विकासचे एन्काऊंटर शहीद पोलिसांना खरी श्रद्धांजली आहे. यामुळे पोलिसांवरील लोकांचा विश्वास आणखी दृढ होईल.

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश