शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Gangster Anil Dujana Encounter: उत्तर प्रदेशात आणखी एक एनकाउंटर: कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 16:01 IST

पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून कुख्यात गुंड अनिल दुजानाच्या शोधते होते.

मेरठ : उत्तर प्रदेशात योगी सरकारने गुन्हेगारांविरोधात नो टॉलरंस पॉलिसी अवलंबली आहे. या अंतर्गत कुख्यात गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कारवाई सुरुच आहे. आज पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना (Anil Dujana) चकमकीत ठार झाला आहे. मेरठ जिल्ह्यात युपी एसटीएफने त्याचा खात्मा केला. यूपी एसटीएफचे प्रमुख आयपीएस अमिताभ यश यांच्याकडून ही माहिती समोर आली आहे. 

अनिल दुजाना उर्फ ​​अनिल नागर याला एसटीएफने चकमकीत ठार केले आहे. यूपी एसटीएफने मेरठमध्ये ही कारवाई केली आहे. अनिल हा मोठा गुन्हा करण्याचा कट आखत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. याच क्रमाने तो मेरठमध्ये लपल्याची माहिती मिळाली. यावेळी झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

विशेष म्हणजे, आज यूपी एसटीएफ लॉन्च होऊन 25 वर्षे झाली आहेत आणि आजच्याच दिवशी मोठे यश मिळाले आहे. अनिल दुजाना याच्यावर खंडणी, लूटमार, जमीन बळकावणे, शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांतर्गत 62 गुन्हे दाखल आहेत, त्यात 15 खुनाचा समावेश आहे. यूपी पोलिसांनी त्याच्यावर रासुका आणि गँगस्टर कायदाही लावला होता. नुकतीच गौतम बुद्ध नगरमधील गुंडांची यादी पोलिसांनी उघड केली. त्यात त्याच्या नावाचाही समावेश होता.

गँगस्टर सुंदर भाटीवर हल्ला अनिल दुजाना यानीच गँगस्टर सुंदर भाटीवर AK 47ने गोळीबार केला होता. अनिल दुजानाने त्याच्या साथीदारांसह सुंदर भाटीवर गाझियाबादच्या भोपुरा भागातील एका फार्महाऊसमध्ये त्याच्या मेव्हण्याच्या लग्नात हल्ला केला, ज्यामध्ये गँगस्टर रणदीपनेही त्याला साथ दिली होती. त्या हल्ल्यात सुंदर भाटी बचावला, पण तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये सुंदर भाटी टोळीने बदला घेण्यासाठी अनिल दुजाना याच्या घरावर हल्ला केला, ज्यामध्ये अनिल दुजानाचा भाऊ जय भगवान मारला गेला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात कुख्यात गुन्हेगार अतिक अहमदचा मुलगा असद अहमदला युपी एसटीएफने चकमकीत ठार केले होते. त्या घटनेच्या काही दिवसानंतर अतिक आणि अशर्फची पोलिसांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या घटनेमुळे युपी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर चहुबाजूंनी टीका होत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी