शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे सोने विकणारी टोळी खामगावात; दोघे पोलीसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 22:46 IST

अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाचे पीएसआय गीते यांनी ही कारवाई केली.

खामगाव: अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी गेलेल्या सोन्याची विक्री केल्याप्रकरणी अमरावती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने खामगावातील दोघांना बुधवारी ताब्यात घेतले. यातील एका आरोपीने चोरीचे सोने सराफाला विकल्याची कबूली दिली. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत मे महिन्यात चोरीची घटना घडली होती. यामध्ये १५७ ग्रॅम सोने चांदीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी अमरावती पोलीसांनी किशोर वायाळ वय ४० रा. मेरा बु. जि. बुलडाणा या चोरट्यास अटक केली.

पोलीस कोठडी दरम्यान त्याने दिलेल्या बयाणावरून बुधवारी अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस पथक खामगावात धडकले. किशोर वायाळ याने दिलेल्या कबुलीनुसार अजय खत्री रा. खामगाव आणि अविनाश मिटकरी रा. खामगाव या दोघांना ताब्यात घेतले. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाचे पीएसआय गीते यांनी ही कारवाई केली. दरम्यान अजय खत्री याने अमरावती येथील चोरीचे सोने खामगावातील सोनल ज्वेलर्स यांना विकल्याचे कबुली दिली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सराफा व्यावासायीकांचीही झाडाझडती घेतली. मित्राच्या मदतीने विकले सोने

मेरा बु. येथील चोरटा किशोर वायाळ योने चोरी केलेले सोने विकायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर अविनाश मिटकरीच्या सांगण्यावरून अजय खत्रीने खामगावातील सराफा व्यावसायीकास १०० गॅम सोने मे महिन्यात विकल्याचे समोर आले. या घटनेमुळे अमरावतीचे चोरीचे सोने विकणारी टोळी खामगावात सक्रीय असल्याचे दिसून येते. 

सराफा व्यावसायीक पोलीसांच्या रडारवर

त्यामुळे सोनल ज्वेलर्सच्या संचालकाला पोलीस स्टेशनला बोलावून झाडाझडती घेतली. खामगाव शहरातील सराफा व्यावसायीक या घटनेमुळे पोलिसांच्या रडारवर सापडले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र