शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! रुग्णालयाच्या ICU मध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 20:53 IST

Crime News : एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना हरियाणाच्या पानीपतमध्ये घडली आहे. एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 22 वर्षीय तरुणीला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तसेच तिला त्रास होऊ लागल्याने हरियाणाच्या मॉडल टाऊन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये तरुणीवर उपचार सुरू होते. त्याच दरम्यान रुग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या दोन जणांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 25 जानेवारी रोजी तरुणीला अचानक भीती आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळेच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आलं. 

तरुणीवर उपचार सुरू असतानाच रात्रीच्या वेळेच रुग्णालयातील एक कर्मचारी त्याची शिफ्ट संपल्यानंतरही घरी गेला नाही. तो आयसीयूमध्येच थांबून राहीला. त्यानंतर जवळपास एक तास तो तरुणीसोबत होता. त्यानंतर दुसरा आरोपी आत गेला आणि त्याने देखील तरुणीवर बलात्कार केला. सकाळी जेव्हा कुटुंबातील काही सदस्य तरुणीला भेटायला गेले. तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेल्या या भयंकर प्रकाराची माहिती दिली. रुग्णालयात झालेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहे. 

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने देखील या प्रकरणी पोलिसांना सर्वोतोपरी सहकार्य करत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार झाल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. चारही महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून आरोपीने हे कृत्य केलं.

भयंकर! एकाच कुटुंबातील 4 महिलांवर बलात्कार, परिसरात खळबळ

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. विष्षू गुर्जर असं आरोपीचं नाव असून पीडित कुटुंबाच्या घराजवळच त्याचा ढाबा आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी कुटुंबातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर त्याने महिलेच्या लहान बहिणी आणि मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेला याची माहिती मिळताच तिने पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच संपूर्ण धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर कुटुंबातील इतर महिला पुढे आल्या आणि आरोपीविरोधात तक्रार दिली.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस