शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अपहरण करणारी टोळी गजाआड; तीन लाखांची रोकड जप्त : म्होरक्याचा शोध सुरू

By अझहर शेख | Updated: April 10, 2025 18:24 IST

शहरातील एका सिग्नलवर दर्यानी यांनी कार उभी केली असता कारजवळ दोघे अनोळखी इसमांनी येऊन चर्चा करायची आहे, असे सांगून एका कारमध्ये बसले.

- अझहर शेख

 नाशिक : शहरातील कार डेकोर व्यावसायिक निखिल दर्यानी ऊर्फ निकू यांचे मागील आठवड्यात दोघांनी त्यांच्या कारमध्ये बसून डोक्याला बंदूक लावून अपहरण केले होते. १ कोटीची खंडणी मागून ५० लाखांची तडजोड करत त्यापैकी १५ लाख रुपये घेतले होते. नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने याप्रकरणी सखोल तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने चौघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून २ लाख ८८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. टोळीचा म्होरक्या  सराईत गुन्हेगार फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.

शहरातील एका सिग्नलवर दर्यानी यांनी कार उभी केली असता कारजवळ दोघे अनोळखी इसमांनी येऊन चर्चा करायची आहे, असे सांगून एका कारमध्ये बसले. त्यांनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावून जीवे ठार मारण्याची धमकी देत कार शहराबाहेर घेऊन जाण्यास भाग पाडल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) भरदुपारी घडली होती. नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूरमार्गे घोटीवरून भंडारदरारोड आदी भागात त्यांना घेऊन जात जीवे ठार मारण्याची धमकी देत हवेत बंदुकीतून दोन राउंड फायर केले होते. यावेळी शहरात त्यांनी त्यांच्या मोबाइलवरून दर्यानी यांच्या भावाशी संपर्क करून ५० लाखांपैकी १५ लाख रुपये देण्यास सांगितले. ही रक्कम घेतल्यानंतर संशयितांनी त्यांना पुन्हा शहराच्या वेशीवर पांडवलेणी येथे आणले. तेथे कार बदलण्याचा प्रयत्नात असताना दर्यानी यांनी कशीबशी सुटका करत पळ काढला होता.

याप्रकरणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाच्या सूचना केल्या. पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे आदींच्या पथकाने संशयित आरोपी सराईत गुन्हेगार मोहम्मद अन्वर सय्यद (३०, रा. जुने नाशिक), सादिक लतीफ सय्यद (३९, लेखानगर) दर्यानी यांच्या दुकानातील कामगार संशयित अल्फरान अश्पाक शेख (२५, रा. जुने नाशिक), अहमद रहिम शेख (२५, रा. वडाळागाव) यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी